

मुंबई, पुढारी ऑनलाईन : सुष्मिता सेन (sushmita sen) आणि रोहमन शॉलची (Rohman Shawl) प्रेमकहाणी इंस्टाग्रामवर एका मेसेजच्या माध्यमातून सुरू झाली होती, पण ही प्रेमकहाणी संपुष्टात आली आहे. याची घोषणा खुद्द सुष्मिताने सोशल मीडियावर केली. गुरुवारी एक फोटो पोस्ट करत सुष्मिताने रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले.
सुष्मिता सेनने (sushmita sen) सोशल मीडियात म्हटले आहे की, 'आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली, आम्ही मित्रच राहिलो!! नातं खूप जुनं झालं होतं.. प्रेम उरलं आहे! या पुढे अंदाज बांधू नका. जगा आणि जगू द्या, सोनेरी आठवणी. कृतज्ञता, प्रेम, मैत्री, लव्ह यु!!!'
सुष्मिता सेनने तिच्या पोस्ट मध्ये #nomorespeculations #liveandletlive #cherishedmemories #gratitude #love #friendship अशा हॅशटॅगचा वापर केला आहे. सुष्मिता सेनच्या या पोस्टवरून हेच सिद्ध होतंय की ती आणि रोहमन चांगले मित्र आहेत. त्यांचे नाते संपुष्टात जरी आले असले तरी दोघांमधील प्रेम कमी झालेले नाही. हे प्रेम पूर्वी जेवढे होते तेवढेच नेहमी राहील, अशी चर्चा बॉलिवूड जगतात सुरू आहे.
सुष्मिता सेन गेल्या अडीच वर्षांपासून रोहमनला डेट करत होती. रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात १५ वर्षांचा फरक आहे. सुष्मिता ४६ वर्षांची तर रोहमन ३० वर्षांचा आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रोहमनचे सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशा यांच्याशीही चांगले संबंध आहेत. रोहमन नेहमीच त्या दोन मुलींचा वडील म्हणवत असे.
सुष्मिता सेन गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यापेक्षा १५ वर्षांनी लहान बॉयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करत होती. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत दिसले. रोहमन देखील सुष्मितासोबत तिच्याच घरी राहत होता. अनेकदा त्या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही मीडियामध्ये आल्या. पण आता दोघांनीही आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. रोहमन शॉल सुष्मिता सेनचे घर सोडून इतरत्र शिफ्ट झाल्याचे समजते आहे.