सभागृहात अजितदादांचा संताप; विरोधी पक्ष, मंत्र्यांसह सदस्यांना झाप झापलं

सभागृहात अजितदादांचा संताप; विरोधी पक्ष, मंत्र्यांसह सदस्यांना झाप झापलं
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात मास्क न वापरण्यावरून आपला संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ठराविक लोकांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना समज द्यावी किंवा थेट सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या बाबतीत गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा विचार सुरू आहे. जगामध्ये विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. येणाऱ्या काही दिवसांत विदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. या गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सभागृहातील सर्व सदस्यांना मास्क वापरण्याची विनंती करत ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर मास्क काढून बोलू शकतो. पण आपलं बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.

https://youtu.be/6Od5mMZ4sb8

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news