Clothes and shoes : वर्षाच्या सुरूवातीलाच सामान्यांच्या खिशाला कात्री 'या' वस्तुंचा महागणार | पुढारी

Clothes and shoes : वर्षाच्या सुरूवातीलाच सामान्यांच्या खिशाला कात्री 'या' वस्तुंचा महागणार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे कपडे तसेच चप्पलवरील जीएसटी कर पाच टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत वाढविल्याच्या परिणामी येत्या १ जानेवारीपासून या दोन्ही वस्तू महागणार आहेत. सामान्य लोकांना या करवाढीचा दणका बसणार आहे. जीएसटी परिषदेने गेल्या सप्टेंबर महिन्यात या दोन वस्तूंवरील करात वाढ केली होती. (Clothes and shoes)

एक जानेवारीपासून कपड्यांसहित हँडलूमची सर्व उत्पादने तसेच कपडे शिवण्यासाठी लागणारे काही प्रकारचे धागे महाग होणार आहेत. यामुळे रेडीमेड कपडे तर महाग होतीलच पण शिवून घेतलेले कपडेही महाग पडणार आहेत.

Clothes and shoes : सामान्य लोकांचा यामुळे खिसा रिकामा

दरम्यान एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे कपडे आणि चप्पलवरील कर वाढविण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे व्यापाऱ्यांची संघटना सीएआयटीचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले आहे.

लहान उद्योगांचा कच्च्या मालाचा खर्च यामुळे वाढेल पण सामान्य लोकांचा यामुळे खिसा रिकामा होईल, असे खंडेलवाल म्हणाले.
दिल्ली व्यापार महासंघाचे अध्यक्ष देवराज बावेजा यांनी देखील सरकारचा निर्णय अतार्किक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Back to top button