यवतमाळ : शिळे अन्न खाल्याने २१ जणांना विषबाधा; तातडीने रुग्णालयात केले दाखल | पुढारी

यवतमाळ : शिळे अन्न खाल्याने २१ जणांना विषबाधा; तातडीने रुग्णालयात केले दाखल

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा: आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा येथे मंगळवारी (दि.२१ मे) धार्मिक पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण ठेवण्यात आले होते. त्यातील बरेचसे जेवण शिल्लक राहिले. हे जेवण बुधवारी (दि.२२ मे) सकाळी काहींनी घेतले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर २१ जणांना विषबाधा झाली असून, या सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जेवण झाल्यानंतर काही वेळाने यातील अनेकांना जुलाब तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या भाविकांना तातडीने दुपारी दोनच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, आर्णी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. यामधील सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आली  असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी म्हसोबा तांडा येथे भेट देऊन आढावा घेतला.

Back to top button