Nagpur Airport : तरुणाला हार्ट अटॅक; पुणे-लखनऊ विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग | पुढारी

Nagpur Airport : तरुणाला हार्ट अटॅक; पुणे-लखनऊ विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-लखनऊ विमानातून प्रवास करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आल्याने विमानाचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ही घटना आज (दि.६) घडली. या तरुणाचे नाव मोहम्मद अहेमद अन्सारी असे आहे. Nagpur Airport

इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ६ ई ३३८ या विमानाने पुणे येथून लखनऊसाठी उड्डाण केले. मात्र, काही वेळातच मोहम्मद अहेमद अन्सारी या तरुणाच्या छातीत दुखू लागले. त्याची प्रकृती लक्षात घेता आपत्कालीन लँडिंग साठी नागपूर विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. विमानतळावर तैनात असलेल्या किम्स किंग्जवे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने तपासणी करीत तातडीने रुग्णालयात भरती केले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यापूर्वी एका ६० वर्षीय बांगलादेशी प्रवाशाला दोनवेळा रक्ताची उलटी झाल्याने एअर अरेबियाच्या शारजाह-चितगाव या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिग करण्यात आले होते. डॉ. हेमंत भोंडेकर यांच्या नेतृत्वातील वैद्यकीय चमूने प्राथमिक तपासणीनंतर त्याला किम्स-किंग्जवे हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. Nagpur Airport

हेही वाचा 

Back to top button