Maharashtra Cabinet Expansion : नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर होणार | पुढारी

Maharashtra Cabinet Expansion : नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर होणार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारमधील असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा राज्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत आहेत. सध्या पितृपक्ष सूरु असल्याने साधारणपणे हा विस्तार नवरात्रात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

काही सूत्रांच्या मते घटस्थापनेला या विस्ताराचा मुहुर्त लागण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांतील आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अर्थातच यात कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याचा फॉर्म्युला दिल्लीत ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

दुसरीकडे केंद्रातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त होत असून लोकसभा निवडणुकीपूर्वी हा शेवटचा विस्तार असेल. आता यावेळी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी भाजपला झुकते माप देण्याचे वरिष्ठ पातळीवर घाटत आहे. या विस्तारात राज्यातून अजित पवार आणि शिंदे गटाला प्रतिनिधित्व मिळणार का ?  याकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button