Maharashtra Politics : पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यात संघर्ष

Maharashtra Politics  : पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे-अजित पवार  यांच्यात संघर्ष

मुंबई; नरेश कदम : पालकमंत्रिपदाचा तिढा काही प्रमाणात सुटला असला तरी सातारा, रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिल्यामुळे शिंदे आणि पवार गटात हा संघर्ष अजूनही धुमसत आहे.  (Maharashtra Politics)

संबंदित बातम्या :

राज्यात महायुतीच्या सत्तेत अजित पवार गट सामील झाल्यापासून खातेवाटप, निधी वाटप यावरून या दोन गटात उभा संघर्ष सुरू आहे. अजित पवार गटाने सत्तेत सामील झाल्यानंतर पालकमंत्रिपदाची यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली होती. परंतु सातारा, रायगड, बीड, कोल्हापूर, पुणे, गोंदिया, परभणी, नाशिक आदी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागितली होती. यातील अजित पवार (पुणे), धनंजय मुंडे (बीड), हसन मुश्रीफ (कोल्हापूर), प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी (गोंदिया) ही पालकमंत्रीपदे अजित पवार गटाला देण्यात आली. भाजपच्या मंत्र्यांनी आपल्याकडील ही पालकमंत्रिपदे अजित पवार गटाला दिली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा, रायगड नाशिक ही पालकमंत्रीपदे सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हा विषय दिल्लीत भाजप हायकमांडकडे घेवून शिंदे आणि फडणवीस गेले. तेथेही शिंदे यांनी आपला हट्ट सोडला नाही. त्यामुळे या सातारा, नाशिक आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे.  (Maharashtra Politics)

मुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांना भाजपकडून शब्द दिला असल्याचे अजित पवार गटाचे आमदार सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. सातारा जिल्हा अजित पवार यांच्यासाठी महत्वाचा आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांचे गांव सातारा जिल्ह्यात आहे. तसेच त्यांचे कट्टर समर्थक शंभू राजे देसाई यांच्याकडे सध्या सातारा जिल्हाचे पालकमंत्री पद आहे. ते शिंदे यांना त्यांच्याकडे ठेवायचे आहे.

दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या कन्येसाठी मागितले आहे. परंतु शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा त्यास विरोध आहे. त्यामुळे शिंदे रायगडवर ठाम आहेत.

नाशिकचे पालकमंत्री अजित पवार गटाचे मंत्री जगन भुजबळ यांच्यासाठी हवे आहे. परंतु शिंदे गटाचे दादा भुसे यांच्याकडे हे पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिंदे अडून बसले आहेत.

अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यापासून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोकले आहे. शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांच्या काही फाईल्स अडवून ठेवल्या असल्याचे पवार गटाचे आमदार सांगत आहेत. त्यामुळे आगामी शिंदे आणि पवार गटातील संघर्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिंदे यांनी नगरविकास यातून निवडणुकीत परस्परांच्या जागा पाण्याचे राजकारण होईल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news