जेईई मेन्स परिक्षेतील गैरव्यवहाराचे कनेक्शन शोधण्यासाठी नागपुरात सीबीआयच्या धाडी | पुढारी

जेईई मेन्स परिक्षेतील गैरव्यवहाराचे कनेक्शन शोधण्यासाठी नागपुरात सीबीआयच्या धाडी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जेईई मेन्स परिक्षेतील गैरप्रकाराचे कनेक्शन तपासण्यासाठी सीबीआयने नागपुरातील काही कोचिंग क्लासेस वर धाडी टाकल्या आहेत. या धाडी दरम्यान सीबीआयने कोचिंग क्लासेसच्या काही दस्तावेजची तपासणी केल्याची माहिती आहे.

काल (दि. १३) रात्री सीबीआयचे पथक दिल्लीहून नागपुरात दाखल झाले. तेव्हापासूनच त्यांची ही तपासणी मोहिम सुरू आहे. नागपुरातील आजमशाह चौक व नंदनवन परिसरात दोन कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या टीमने ही चौकशी केली.

गेल्या आठवड्यात दिल्ली, जमशेदपूर, इंदूर, बंगळूर आणि पुण्यात काही कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपुरात तपास मोहीम राबविल्याची माहिती आहे.

जेईई मेन्स परीक्षेत परीक्षार्थ्यांना निवडक नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी आमिश देऊन काही गैरप्रकार केल्याचं संशय या कोचिंग क्लासेस बद्दल आहे. या करीता विद्यार्थ्याकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्या असल्याचा सीबीआयला संशय आहे.

याबाबत सीबीआय कडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र कोचिंग क्लासेस वर धाडी टाकल्याचा वृत्तास सीबीआय अधिकार्‍यांनी नकारही दिलेला नाही.

Back to top button