अमरावती : मेळघाटात वीज पडून एकाचा मृत्यू | पुढारी

अमरावती : मेळघाटात वीज पडून एकाचा मृत्यू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मेळघाटात वीज पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सालाई येथील देवराज धनालाल दारशिंबे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ‌‌ ही घटना गुरुवारी (८ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास घडली. दारशिंबे हे शेतातील कामे उरकून बैल जोडी घेऊन शेतकरी घरी परत येत होते. दरम्यान, जोरदार पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Back to top button