दहीहंडी वाद : निर्बंध झुगारून मनसेने पोलिसांसमोर फोडली दहीहंडी

दहीहंडी वाद : निर्बंध झुगारून मनसेने पोलिसांसमोर फोडली दहीहंडी

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : राज्‍य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी ला परवानगी नाकारली होती. शासनाच्या या निर्णयाविरोधात भाजप आणि शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवला होता. दरम्‍यान आज राज्य सरकारचे निर्बंध झुगारून मनसेने दहीहंडी फोडली.

(सोमवार) काळाचौकी येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांचा विरोध झुगारून दुसऱ्या थरावर चढत दहीहंडी फोडून शासनाचा निषेध व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने काळाचौकी येथील शहीद भगतसिंह मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

मनसेने दहीहंडी फोडली

काल (रविवार) रात्री नांदगावकर यांच्यासह मनसे शिवडी विभागाध्यक्ष नंदु चिले, उपविभागाध्यक्ष संतोष नलावडे यांना काळाचौकी पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरम्यान आज (सोमवार) सकाळपासूनच पोलिसांनी मैदानाचा ताबा घेत बॅरिकेड्स लावले होते.

त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मैदानाबाहेरच हंडी लावली. यावेळी पोलिसांनी विरोध करताच एका काठीला दहीहंडी बांधून कार्यकर्त्यांनी हंडी आणली. यावेळी नांदगावकर यांनी एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर चढत पोलिसांसमोर ही हंडी फोडली. त्यानंतर पोलिसांनी नांदगावकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे येथील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण बनले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news