ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे येथे पावसाचा जोर कायम आहे. भिंत आणि झाडे पडून १४ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी पहाटे पासून कायम आहे.
अधिक वाचा –
मागील २४ तासात ठाणे शहरात १६१.८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी ८.३० ते १०.३० या एक तासात ५८.४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळाच्या पटरीत पाणी साचलेले होते. त्यातच तक्रारींनीही ठाण्यात अर्धशतक पार केले आहे.
यामध्ये झाडे, भिंती, आग, पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळ्पास १४ गाड्यांचे नुकसान झाले आहे.
घोडबंदर रोडवरील एका सोसायटीत सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. धरण क्षेत्रात ही समाधानकारक पाऊस झाला आहे.
याशिवाय पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे. नदीतील पुराचे पाण्यासोबत पानवेली व नदीतील गवत वाहत आले. पिसे येथील पंपाच्या स्टेशनमधे अडकल्याने पंपाचा फ्लो कमी झाला आहे.
अधिक वाचा –
शनिवारी रात्री पासून पावसाने चांगला जोर धरला आहे. उघडझाप करत दोन दिवसात पावसाने दमदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. सोमवारी ही पावसाचा जोर कायम होता.
सकाळी ८.३० ते ९.३० वाजण्याच्या सुमारास ४२.४२ मिमी तर त्या नंतरच्या एक तासात १६ मिमी पाऊस झाला. त्यानंतर ही पावसाचे बरसणे सुरू होते.
गेल्या चोवीस तासात १६१.८२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले होते.
पाणी तुंबण्याच्या एकूण २३ तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा, कोपरी,वागळे इस्टेट, मुंब्रा, नौपाडा येथील वेगवेगळ्या भागात पाणी तुंबले होते.
तर शहरात पाच ठिकाणी सरंक्षण भिंती कोसळल्या आहेत. त्यामध्ये घोडबंदर रोड येथील कॉसमॉस लाऊंज येथील भिंत पडल्याने ५ चारचाकी तर ४ दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा –
मुंब्र्यातील अमृतनगर येथे १० ते १५ फुटांची भिंत पडली आहे. खारीगाव, ठाणे चेंदणी कोळीवाडा, घोडबंदर रोड डोंगरीपाडा येथे भिंत पडली आहे. शहरात ९ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे.
दादोजी कोंडदेव येथे तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाड्या महापालिकेच्या आहेत. त्यामध्ये एक रुग्णवाहिकेचा समावेश आहे.
वाघबील विजयनगरी येथे पडलेल्या झाडामुळे दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच नौपाडा, कळवा, मुंब्रा, उपवन आदी ठिकाणी झाले पडली आहेत. तसेच दोन ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक झाली आहे.
शहरात वागळे इस्टेट ,ढोकाळी आणि वाघबील येथे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.
वाघबील नाका येथील लोटस सोसायटी परिसरात घटना घडली. सोसायटीचा सुरक्षारक्षक संतलाल यादव (वय ४०) यांच्या डोक्यात वाळलेल्या झाडाची फांदी पडली.
यात ते जखमी झाले आहेत. डोक्याला १३ टाके पडले असून पातलीपाडा येथील रुग्णालयात दाखल केले होते.
पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे.
नदीतील पुराचे पाण्यासोबत पानवेली व नदीतील गवत वाहत आले. पिसे येथील पंपाच्या स्टेशनरमधे अडकल्याने पंपाचा फ्लो कमी झाला आहे.
पिसे येथून पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. शहरांतील सर्व भागांत सोमवारपासून पुढील २ दवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. अशी माहिती ठामपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!