लोकल वाहतूक कोलमडली, विक्रोळी- कांजूरमार्गावर भरले पाणी | पुढारी

लोकल वाहतूक कोलमडली, विक्रोळी- कांजूरमार्गावर भरले पाणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: पावसाने आपला जोर कायम असल्याने मध्य रेल्वेची सिएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतूक सोमवारी (दि.१९) कोलमडली. यामुळे मध्य रेल्वेने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.

अधिक वाचा 

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी पहाटेपासून उशिराने का पण सुरु होती. परंतु, सोमवारी सकाळी ९ नंतर पावसाचा जोर वाढला. कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान पाणी भरल्याने लाेकल वाहतूक विस्कळीत झाली.

अधिक वाचा 

अप आणि डाउन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. परिमाणी, सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा बंद करण्यात आली. ठाणे- कल्याण, कर्जत, कसारा, सीएसएमटी- पनवेल, नेरुळ- खारकोपर तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरु आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.

२४ तासात पाणीसाठा १ लाख २८ हजार दशलक्ष लिटरने वाढला

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व भातसा या प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे.

गेल्या २४ तासात पाणीसाठयात १ लाख २८ हजार ९३ दशलक्ष लीटर इतकी वाढ झाली आहे. १८ जुलैला तलावातील पाणीसाठा २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लीटर इतका होता. १९ जुलैला हा पाणीसाठा ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहचला. शहराला दररोज सर्वाधिक १ हजार ८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही वाढत आहे.

हेही वाचलंत का?

पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

Back to top button