डोंबिवली सामूहिक बलात्कार : ८८५ पानांचे आरोपपत्र दाखल | पुढारी

डोंबिवली सामूहिक बलात्कार : ८८५ पानांचे आरोपपत्र दाखल

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा

सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची जगभरात ओळख आहे. अशी ओळख असलेली ही नगरी सामूहिक अत्याचारकांडाने हादरली होती. एका पंधरा वर्षांच्या अल्पवीयन तरुणीवर तब्बल 33 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती.

देशभरात खळबळ माजवणाऱ्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी दोषारोपपत्र कल्याण जिल्हा न्यायालयत सादर केले. बहुचर्चित असलेल्या या गुन्ह्याचे दोषारोपपत्र 885 पानांचे आहे. तर या गुन्ह्याचा तपास करताना तब्बल 121 साक्षीदरांचे जबाब नोंदवले आहेत.

या गुन्ह्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात 376, 376 (एन), 376 (3), 367 (ड) (अ) सह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

बलात्कार प्रकरणातील आरोपी सुटता कामा नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या गुह्यातील 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती दोषारोपपत्रत दिली आहे. पिडीतेवर डोंबिवलीसह बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्याबाबतचा घटनास्थळी पंचनाम्याचा उल्लेख दोषारोपपत्रत नमूद आहे.

पीडित तरुणी एका नातेवाईकाच्या संपर्कात येऊन मुख्य आरोपी असलेल्या तरुणाची भेट घडवून दिली. त्यांनतर सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचार करतानाचे मोबईलमध्ये चित्रीकरण केले.

व्हायरल करण्याची धमकी देऊन  पीडितेवर सुमारे साडेआठ महिने विविध ठिकाणी नेऊन तिला शारिरीक संबंधांसाठी भाग पाडले. विशेष म्हणजे तिने सुरूवातीला या सगळ्याला नकार दिला. मात्र पीडितेचे विवस्त्र व्हीडिओ तसच शारिरीक संबंधांचा व्हीडिओही मोबाईलवर शूट करण्यात आले. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार अत्याचार केल्याची माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.

Back to top button