Thane News: पत्नीसह प्रियकरावर घरफोडीचा गुन्हा, भाईंदरमधील प्रकार; 30 लाखांचा माल लंपास | पुढारी

Thane News: पत्नीसह प्रियकरावर घरफोडीचा गुन्हा, भाईंदरमधील प्रकार; 30 लाखांचा माल लंपास

मिरा रोड; पुढारी वृत्तसेवा: भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये लाईट व साउंडचे काम करणार्‍या व्यक्तीच्या घरी स्वतःच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून 30 लाख 90 हजाराची घरफोडी केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरात गणेश हंडगर हे राहत असून त्यांची गेल्या 12 वर्षांपासून मुस्कान बरोबर ओळख होती. त्या ओळखीतून दोघांनी 2019 साली लग्न केले. त्यांची पत्नी आरोपी मुस्कान उर्फ बेबी हंडगर हिने व तिचा प्रियकर सलमान खान या दोघांनी मिळून हंडगर यांच्या घरी चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सोन्याचे दागिने त्यात 15 तोळे , 6 लाख रुपयाच्या सोन्याच्या बांगड्या, 2.5 तोळे सोन्याचे 1 लाख रुपयाचे दोन सोन्याचे मंगळसुत्र, 4 तोळ्याचे 1 लाख 60 रु. सोन्याचे कडे, 22 तोळ्याचे 8 लाख 80 हजार रुपयाचे सोन्याचे ब्रेसलेट, 4 तोळ्याचे 1 लाख 60 रु. 6 सोन्याच्या अंगठ्या, 2 तोळ्याच्या 80 हजाराची सोन्याची चेन व 4 तोळ्याच्या 1 लाख 60 रु. कानातील सोन्याच्या रिंगा आणि 9 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 30 लाख 90 हजाराचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेल्याप्रकरणी घरफोडी सह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी याने उत्तरप्रदेशातुन हंडगर यांना व्हिडीओ कॉल करून बंदुका दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दुसरे म्हणजे आरोपीच्या ओळखीच्या पोलीसांनीही फोन करून फिर्यादीला धमकीवजा दम दिल्याचे म्हटले आहे.

Back to top button