ठाणे : डोंबिवलीतील कोपर गावात धोकादायक इमारतीचा भाग कोसळला | पुढारी

ठाणे : डोंबिवलीतील कोपर गावात धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव येथील धोकादायक असलेल्या लक्ष्मण पावशे नावाच्या दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांना त्वरित इमारतीमधून बाहेर काढण्यात आल्याने जीवित हानी टळली. या घटनेची माहिती कळताच पालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

केडीएमसीच्या डोंबिवली पश्चिम विभगातील ‘हा’ प्रभाग क्षेत्रातील कोपरगावातील लक्ष्मण पावशे नावाच्या दोन मजली इमारत धोकादायक अवस्थेत असलेली २० ते २५ वर्ष जुनी इमारत भग्नावस्थेत उभी असून या इमारतीत ९ घरे होती. त्यातील ६ घरांमध्ये लोक राहत होते.मंगळवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास या धोकादायक इमारतीतील माती पडण्याची सुरुवात झाली व या इमारतीचा इमारतीचा काही भाग कोसळू लागल्याने परिणामी प्रसंगावधानाने इमारतीतील लोकांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान घटनास्थळी पालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ दाखल झाले होते.

Back to top button