ठाण्यात लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर | पुढारी

ठाण्यात लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करीत त्यांच्याकडून लाच घेण्यामध्ये महसूल विभाग दरवर्षी आघाडीवर राहतो. यंदादेखील लाच घेण्यात महसूल विभाग प्रथम क्रमांकावर असून, महापालिका दुसऱ्या तर पोलीस विभाग तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आढळून आले आहे. लाचखोरीच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, १ जानेवारी २०२२ ते आजतागायत ९० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दरवर्षी विविध सरकारी कार्यालयांबाबत नागरिकांकडून दाखल केल्या जातात. त्यानुसार ‘एसीबी’कडून संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. यावर्षी ‘एसीबी’च्या ठाणे विभागांतर्गत सापळे रचून कारवाई करण्यात आली असून, १ जानेवारी २०२२ ते आजतागायत ९० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये महसूल विभाग आणि महापालिका विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाचखोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या दोन्ही विभागातील एकूण ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे लाचखोरीत या विभागातील अधिकारी आघाडीवर असल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे.

१ जानेवारी २०२२ ते आजतागायत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९० अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात
लाचेप्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील २४ अधिकारी, कर्मचारी हे महसूल विभागातील आहे, तर, ठाणे महापालिकेतील २१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचेप्रकरणात पकडण्यात आले आहेत. त्याचबरोबर, पोलिस दलातील १५ अधिकाऱ्यांविरोधात लाचेच्या तक्रार दाखल आहेत, तर, उर्वरित प्रकरणांत शिक्षण विभागाचे ११,
वन विभागा आणि कृषी विभागाचे प्रत्येकी चार महावितरण विभागाचे तीन, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे
प्रत्येकी दोन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विक्रीकर विभागातील प्रत्येकी एकाचा सामावेश आहे.

Back to top button