मुंब्रा येथून एक संशयित ताब्यात, महाराष्ट्र ‘एटीएस’ची कारवाई | पुढारी

मुंब्रा येथून एक संशयित ताब्यात, महाराष्ट्र 'एटीएस'ची कारवाई

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र दहशवाद विराेधी पथकाने ( एटीएस ) रविवारी ठाणे जवळील मुंब्रा येथून एका संशयित आरोपीला अटक केली. रिझवान असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेखच्या चौकशीत रिझवानचे नाव समोर आले. यानंतर एटीएस पथकाने मुंब्रा येथून रिझवान यास ताब्यात घेतले आहे.

मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. यावेळी दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांसह सहा संशयितांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर सर्व राज्यांच्या एटीएस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांमध्ये एक मुंबईचा रहिवाशाचा समावेश हाेता.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य एटीएस पथकाने मुंबईतून शनिवारी झाकीर हुसेन शेख या संशयित दहशतवादी कारवाईमध्ये सहभागी असलेल्या आरोपीस अटक केली होती.

झाकीरच्या चौकशीतून मुंब्रा येथे राहणारा रिझवान हा देखील दहशतवादी कटात सामील असल्याची माहिती समोर आली.

मुंबई एटीएस पथकाने मुंब्रातील चांदनगर भागातून रविवारी रिझवान यास ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेला रिझवान चांदनगर येथील नुरी सोसायटीत भाड्याच्या घरात राहायचा. त्याचा एक खासगी शिकवणीही घेत असे.

याआधी तो मुंबईत शिक्षक म्हणून काम करायचा अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचलं का ? 

पाहा व्हिडिओ 

Back to top button