

करमाड ; पुढारी वृत्तसेवा : शेद्रा एमआयडीसी हरमन कंपनीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. कारच्या धडकेत महिला ठार झाली. या अपघातात आई ठार झाली, तर मुलगा व दोन नातू गंभीर जखमी झाले आहेत. कारच्या धडकेत महिला ठार झाल्याने कार चालकाविराेधात नागरिकांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
आई कचराबाई जाधव (वय ६०) या अपघातात ठार झाल्या असून, मुलगा अनिल जाधव(३५) व नात छकुली जाधव (१२) आणि बंटी जाधव (१०) सर्व मुळ राहणार (कात्राबाद ता.जि. औरंगाबाद, सध्या रा. नाथनगर,वडखा ता. जि. औरंगाबाद ) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, रविवार रात्री पावणे नऊच्या सुमारास अनिल जाधव हे शेद्रा एमआयडीसी लगतच्या नाथनगर, वडखा येथील घराकडून कुंभेफळ शेद्रा एमआयडीसीकडे एमएच २० डीडब्ल्यू ३०५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून निघाले हाेते.
यावेळी त्यांच्या सोबत आई व दोन मुले होती.
हरमन कंपनी जवळ पाठीमागून एमएच २० एफटी ६८७८ या क्रमांकाच्या कारने भरधाव वेगाने येऊन जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीला कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी ६० फूट उंच हवेत उडाली.
गाडीवरील सर्व वेगवेगळ्या दिशेला फेकले गेले.
कार २०० फूट अंतरावर जाऊन थांबली. दुचाकीवरील चाैघे गंभीर जखमी झाले .
यावेळी रस्त्यावर सर्वत्र रक्त पसरले होते. या अपघाताची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले.
मात्र या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कचराबाई जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कचराबाई जाधव यांचा त्म लगा अनिल जाधव व नातू धकुली जाधव आणि बंटी जाधव यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास चिकलठाणा पोलीस करत आहेत.