किरकोळ वादातून धारधार शस्‍त्राने एकाचा खून - पुढारी

किरकोळ वादातून धारधार शस्‍त्राने एकाचा खून

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादातून पाच जणांनी धारधार शस्त्राने एकाचा खून केला. ही घटना आज (सोमवार) पहाटे उघडकीस आली. संपत गायकवाड (४५, रा. अण्णाभाऊ साठे नगर, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. किरकोळ वादातून धारधार शस्त्राने एकाचा खून झाल्‍याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संपत गायकवाड आणि आरोपी यांच्यात रविवारी (दि. १९) किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सोमवारी पहाटे संपत यांचा खून केला.

या प्रकरणी पाेलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, निगडी पोलीस तपास करीत आहेत

पहा व्हिडिओ : स्त्रीच्या कर्तुत्वाला सन्मान देणारी अमृता फडणवीसांची गणेश वंदना

Back to top button