ठाणे : फटाक्यांचे सर्वाधिक प्रदूषण मुंबई-पुण्यात | पुढारी

ठाणे : फटाक्यांचे सर्वाधिक प्रदूषण मुंबई-पुण्यात

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  फटाके फोडणे, हे तरूणाईला आनंददायी वाटतं असले तरी दाट लोकसंख्येच्या शहरात मात्र हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याने मुंबई-पुणे शहरे सर्वाधिक प्रदूषीत झाली. दिवाळीच्या दिवसात वायू प्रदूषणामध्ये मुंबई 143, तर पुणे 222 टक्के प्रदुषण झाल्याचे पुढे आले आहे.

हवेत सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रेट  या चार घातक वायूंचे प्रमाण वाढल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे पुढे आले. हवेतील प्रदुषण वाढण्याचे कारण दिवाळीतील फटाके असल्याचे स्पष्ट झाले आहे. फटाक्यांमुळे पर्यावरणीय प्रदूषण वाढल्याने आरोग्यासाठी ते घातक ठरत आहे.प्रामुख्याने श्वसनाचे आणि ह्दयाचे आजार यामुळे बळावत आहेत.

शहरांमध्ये वाढत्या वाहतूकीमुळे वाहनांच्या धुरांचे प्रमाण अधिक आहे. तसेच औद्योगिक कचर्‍याच्या ज्वलनानेही प्रदूषण वाढतेच आहे. यात फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडली आहे. राज्यभरातील फटाक्यांच्या प्रदूषणाचे सर्वाधिक
प्रमाण पुण्यात आढळून आले असून 22 ते 31 या दिवाळीच्या कालखंडात मुंबईचे प्रदुषण सरासरी 200 एक्युब
एवढे होते. तर पुण्यामध्ये हे सरासरी प्रमाण 198 पर्यंत खाली घसरले होते. औरंगाबादमध्ये हे प्रमाण सरासरी
160 तर नाशिक 102 एवढे प्रमाण आढळूण आले. मुंबई-ठाण्यानंतर पुणे, औरंगाबादमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक होते, त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हवेची गुणवत्ता घसरल्याने दाट लोकसंख्येच्या शहरात आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागल्या आहेत.

मुंबई शहरात 22 ऑक्टोबर विषारी घटक 80 ट ?े, 23 ला 138, 24 रोजी 129, 25 रोजी 223, 26रोजी 172, 27 रोजी 243, 28 रोजी 137, 29 रोजी 143 तर 30 रोजी 160 आणि 31 ला 150 पर्यंत हे दुषित वायुंचे प्रमाण आढळून
आले. फटाके वाजवू नये, यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी आवाहन केल्यानंतरही फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही, हेही स्पष्ट झाले.

दिवाळीच्या दिवसात फटाक्यांच्या प्रदूषणाने हवेतील प्रदूषणाचा त्रास लहान मुले व ज्येष्ठांना झाला होता. विशेषत… अस्थमाचा त्रास असणार्‍या लहान मुलांच्या त्रासात या प्रदूषणाने वाढ झाली. तसेच कफाचे विकार जास्त बळावले. ज्येष्ठ नागरिकांची ऑक्सिजनची पातळी आधीच वयोमानानुसार कमी होत असते, फटाक्यांचे प्रदूषण तसेच आवाज यामुळे घरांच्या खिडक्या-दारे बंद ठेवण्यात येतात, त्याचाही त्रास ज्येष्ठांच्या आरोग्यावर जाणवला. प्रदूषणामुळे छातीत कफ होणार्‍या रुग्णांतही वाढ झाली होती.
– डॉ. संतोष कदम
राज्य उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

Back to top button