Madha Lok Sabha Election : सांगोला तालुक्यात 5.10 टक्के मतदान | पुढारी

Madha Lok Sabha Election : सांगोला तालुक्यात 5.10 टक्के मतदान

सांगोला : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला तालुक्यात सकाळी सात वाजल्यापासून अत्यंत चुरशीने मतदान सुरू झाले आहे. सकाळच्या सुमारास ऊन कमी असल्याने मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. विशेष करून वृद्ध नागरिक सकाळी लवकर मतदान करण्याला प्राधान्य देत आहेत. अकोला येथील मतदान केंद्र नंबर १९९ काही वेळ मतदान मशीन बंद पडले होते.

दरम्यान निवडणूक कार्यालयाकडून माढा लोकसभा मतदारसंघातील सकाळी सात ते सकाळी 10 या तीन तासातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला तालुक्यात 5. 10 टक्के इतके मतदान झाले आहे. पधरा हजार ८६७ मतदारांनी आपल्‍या मतदानाचा हक्क बजावला आहे.

हेही वाचा : 

Back to top button