दैनिक ‘पुढारी च्या नूतन कार्यालय उद्घाटनप्रसंगी मान्यवरांची मांदियाळी | पुढारी

दैनिक ‘पुढारी च्या नूतन कार्यालय उद्घाटनप्रसंगी मान्यवरांची मांदियाळी

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील अग्रगण्य निर्भीड दैनिक ‘पुढारी च्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. या सोहळ्यास सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मान्यवरांची मांदियाळी होती.

समाजाचे अविभाज्य अंग व मुखपत्र बनून दै. ‘पुढारी’ 83 वर्षे यशस्वी वाटचाल करीत आहे. दै. ‘पुढारी’च्या सोलापूर आवृत्तीची अशाच पद्धतीने दिमाखात यशस्वी वाटचाल सुरू आहे. सोलापूर शहरातील दै. ‘पुढारी’ कार्यालयाच्या नूतन वास्तूचे रविवारी

सायंकाळी 6 वाजता फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्‍त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम, आ. सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आ. धनाजीराव साठे, माजी आ. दिलीप माने, मैंदर्गी हिरेमठ संस्थानचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, शरद कोळी आदी उपस्थित होते.

यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, न्यूज ब्युरो चीफ अमृत चौगुले, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दै.‘पुढारी’च्या वाटचालीचे कौतुक केले.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, दैनिक ‘पुढारी जनमानसात रूजत आहे. समाजकार्यात दै. ‘पुढारी’ने हिरीरीने सहभाग घेत आहे, सोलापूरच्या विकासात दैनिक ‘पुढारी चे योगदान महत्वाचे आहे. ‘पुढारी’ची अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्‍त केली.

यावेळी आयोजित स्नेहमेळाव्यास सामाजिक, राकजकीय, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Back to top button