सोलापूर : मध्य रेल्वेच्या पथकाकडून स्थानकांची पाहणी | पुढारी

सोलापूर : मध्य रेल्वेच्या पथकाकडून स्थानकांची पाहणी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवा सुविधा समितीने (पीएसी) रविवारपासून सोलापूर विभागातील गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर या रेल्वेस्थानकांची पाहणी केली. या पाहणीत स्थानकांवरील समस्या, प्रवाशांच्या अडचणींबाबतच्या मागणीचे निवेदन विविध प्रवासी संघटनांकडून डॉ. राजेंद्र फडके, कैलास वर्मा, रविचंद्रम या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आले. सोमवारी सोलापूर स्थानकावर पाहणी होणार आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अक्कलकोट रोड, गाणगापूर या स्थानकांची तपासणी रविवारी (दि.26) झाली. सोलापूर, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड या स्थानकांची तपासणी सोमवार, दि.27 रोजी होणार आहे. अहमदनगर, शिर्डी या स्थानकांची मंगळवार, दि.28 रोजी तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल समितीमार्फत रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. या अहवालातून संबंधित स्थानकांवरील सुरक्षा व सुविधाचा विचार करुन निधी उपलब्ध करुन देणात येणार असल्याचे समजते.

सोलापूर रेल्वे स्थानकाबाबत अनेकवेळा तक्रारीचे वारंवार निवेदन देण्यात आले आहे, परंतु यावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही. रेल्वे प्रवासी सुविधा समितीकडून याबाबत गांभीर्याने दखल घेतली जाईल ,अशी अपेक्षा करतो.
– राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी संघटना

Back to top button