सोलापूर : वाद पेटला! काँग्रेस शहराध्यक्ष वाले यांचा राजीनामा देण्याचा इशारा | पुढारी

सोलापूर : वाद पेटला! काँग्रेस शहराध्यक्ष वाले यांचा राजीनामा देण्याचा इशारा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष वाले यांच्या राजीनामाचा इशारा दिला आहे. बुधवारी कॉंग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मानापमानावरून पदाधिकारी यांच्यात वाद पेटला. त्यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष वाले यांनी पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका घेतली.

अधिक वाचा- 

मुख्यमंत्री ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपची तक्रार

गणेशोत्सवात पीओपी मूर्तींवर बंदी कायम, पण अटी आणि शर्तींवर मूर्ती विकण्यास परवानगी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे येत्या ३१ ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष त्याची तयारी करत आहे.

अधिक वाचा- 

‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता?

तरुणांमध्ये हृदयविकार वाढल्याचे चित्र : डॉ. बिपीनचंद्र भामरे

पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी

मागील तीन दिवसांपासून काँग्रेस भवनात बैठका सुरू आहेत. शहराध्यक्ष वाले बुधवारी दिवसभर काँग्रेस भवनात थांबून नियोजन करत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन काँग्रेस भवनात करण्यात आले होते.
शहराध्यक्ष वाले आणि परिवहन समितीचे माजी सभापती केशव पिंगळे यांच्यात हमरीतुमरी झाली. यावेळी दोघेही एकमेकांच्या अंगावर सुद्धा धावून गेल्याची माहिती कार्यकर्ते कडून मिळाली.

अधिक वाचा- 

गर्भधारणेचा विचार करताय? तर ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस

या बैठकीत इंगळे हे तावातावाने उठले, त्यांनी प्रकाश वाले यांच्यावर निशाणा साधला. वाले बैठकीला बोलवत नाहीत. बोलू देत नाहीत. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद सांभाळता येत नाही तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

यावेळी इंगळे यांना काहीजनांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद एवढा होता की, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतसुद्धा प्रसंग आला होता.

दरम्यान, वाले हे भाषण करायला उठले. कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने वैतागलेल्या वाले यांनी थेट अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. अशी भाषणात घोषणा केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी इंगळे यांचा निषेध नोंदवला.

यावेळी वाले यांचे अनेकांनी समर्थन केले. भटक्या विमुक्त विभागाचे युवक शहराध्यक्ष पवन गायकवाड यांनी समर्थन केल. वाले यांच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याची भूमिका घेतली.

याबाबत पत्रकारांना बोलताना वाले म्हणाले, वाद होता. तो मिटला त्याला एवढं महत्व देण्याचे कारण नाही. असे सांगून बोलणे टाळले.

हेदेखील वाचा-

Back to top button