तरुणांमध्ये हृदयविकार वाढल्याचे चित्र : डॉ. बिपीनचंद्र भामरे

तरुणांमध्ये हृदयविकार वाढल्याचे चित्र : डॉ. बिपीनचंद्र भामरे
Published on
Updated on

बदलती जीवनशैली, आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली तरुणांमध्ये देखील हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. तरुणांमधील हृदयविकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या आजारांपैकी हृदयविकार हा जगभरातील प्रथम क्रमांकाचा आजार आहे. स्त्रियांच्या तुलनेत याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक दिसून येते.

अ‍ॅथोरोक्लेरोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या आत पट्टिका तयार होतात. त्यामुळे धमन्या कठोर तसेच संकुचित बनतात. रक्तवाहिनीमध्ये चरबी व तत्सम पदार्थ जमा होत जातात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशाप्रकारे, अकाली हृदयरोगाची प्रकरणे जागतिक स्तरावर वाढत आहेत. केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर 35 ते 50 वयोगटातील तरुणांनाही जीवनशैलीच्या चुकीच्या सवयींंमुळे हृदयविकाराच्या विविध समस्या येतात. शारीरिक हालचालींची कमतरता, धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीतील वाढ या अकाली हृदयाच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतात.

हृदयरोगासाठी अनुवंशिकता हे देखील महत्त्वाचे कारण आहे. पुरुष आणि स्त्रियांनी -हृदयासंबंधी चेतावणीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. एथेरोस्क्लेरोसिस हा तारुण्यात देखील होऊ शकतो.

हृदयासाठी अनुकूल टिप्स

अकाली हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. कारण, चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग बळावतो. वजन नियंत्रणात ठेवणे, रक्तातील साखरेची पातळी सामान्य श्रेणीत ठेवणे आणि निरोगी राहणे ही काळाची गरज आहे. तसेच दैनंदिन जीवनात निरोगी सवयी आपण स्वीकारल्या पाहिजेत.

धूम्रपान सोडा : धूम्रपान सोडणे ही तुमच्या निरोगी हृदयासाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. धूम्रपान सोडल्यानंतर एक वर्षानंतर नियमित धूम्रपान करणार्‍याच्या तुलनेत हृदयरोगाचा धोका दुपटीने कमी होतो.

शारीरिक हालचाली वाढवा आणि तुमचे वजन राखून ठेवा : शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा आणि सक्रियपणे हृदयाच्या आजारांचा धोका कमी करा, हे तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तणावमुक्त ठेवण्यास मदत करू शकते. सायकलिंग, जॉगिंग, एरोबिक्स आणि इतर शारीरिक व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि तुमचे वजन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

आहारात फायबरचा समावेश करा : फायबरने भरलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. जास्तीत जास्त फायबर असलेल्या ओट्स, तृणधान्ये, बटाटे (सालीसकट), फळे आणि भाज्या खाण्यासाठी निवडा.

चरबीयुक्त पदार्थ टाळा : चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

अल्कोहोलचे सेवन कमी करा : कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात, जे तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच, नियमितपणे जास्त प्रमाणात अल्कोहोल पिण्यामुळे हृदयाचे आजार होतात.

मिठाचे सेवन कमी करा : आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास उच्च रक्तदाबाचा धोका असतो. म्हणूनच, निरोगी रक्तदाब राखण्यासाठी आपण दररोज वापरत असलेले मीठ कमी करा. प्रौढांनी दररोज एक चमचापेक्षा कमी मीठ खावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news