सोलापूर : गुर्रम, बोमड्याल, चंदनशिवे आदींसह 143 जणांचे अर्ज | पुढारी

सोलापूर : गुर्रम, बोमड्याल, चंदनशिवे आदींसह 143 जणांचे अर्ज

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पूर्व भागाचे लक्ष लागलेल्या मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 143 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये विद्यमान चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजयकुमार आरकाल, अविनाश बोमड्याल, आनंद चंदनशिवे आदी दिग्गजांचा समावेश आहे. सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. गत चार दिवसांत एकूण 143 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

यामध्ये विद्यमान चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, संचालक डॉ. विजयकुमार आरकाल अविनाश बोमड्याल, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, काशिनाथ गड्डम, आनंद चंदनशिवे, तिरुपती विडप, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, मनोहर अन्नलदास, काशिनाथ दासरी, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी, अंबादास मिठ्ठाकोल, अशोक इंदापुरे, अशोक जैन, शशिकांत केंची, मनोहर इगे, गोवर्धन कमटम, डॉ. सुदीप संभारम, सरिता वडनाल, सुरेखा बोमड्याल, अंबिका येमूल, दयानंद आडम, राजेशम येमूल, पांडुरंग दिड्डी, अंबादास आरगोंडा, लक्ष्मण चिंताकिंदी, रमेश विडप, नरसय्या वडनाल, श्रीहरी विडप, नरसिंगराव येमूल, सिद्राम आडकी आदींचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (दि. 17) अंतिम दिवसी आणखीन किती अर्ज दाखल होणार याविषयी उत्सुकता आहे.

बोल्लींची नवीन पिढी निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीसाठी पूर्व भागाच्या सहकार क्षेत्राचे सर्वेसर्वा समजले जाणारे व रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांचे चिरंजीव श्रीधर यांनीदेखील अर्ज दाखल केला आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास बोल्ली घराण्याची नवीन पिढी सहकार क्षेत्रात उतरणार आहे. श्रीधर यांना उमेदवारी मिळणार की नाही याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button