‘पंढरपूर’ची प्रारूप प्रभाग रचना जाहीर | पुढारी

‘पंढरपूर’ची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाकडून पंढरपूर नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या आदेशानुसार पंढरपूर नगरपरिषेद निवडणूक 2022 करिता प्रारुप प्रभाग रचना गुरुवार, 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेबाबत काही हरकती असतील तर नागरिकांना त्यावर 17 मार्च पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने नगरपरिषद निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी राजकीय हलचाली सुरू केल्या आहेत.

  • प्रभाग क्रमांक : 1 (लोकसंख्या 5073) यामध्ये अनिल नगर, भागवती देवी मंदिर, कैकाडी महाराज मठ, नामानंद झोपडपट्टी, कडबे गल्ली, जुनी वडार गल्ली, कुंभार गल्ली, शिंदेनाईक नगर.
  • प्रभाग क्रमांक : 2 (लोकसंख्या 5046) यामध्ये दाळे गल्ली, डोंबे गल्ली परिसर, कोर्टासमोरील लोकमान्य विद्यालय, डोंबे पुतळा, वाघुले बिल्डींग परिसर, दाळे गल्ली तालिम.
  • प्रभाग क्र. : 3 (लोकसंख्या 5539) अनिल नगर, संसर्गजन्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, व्यास नारायण झोपडपट्टी, काशीकापडी गल्ली,
  • प्रभाग क्र. : 4 (लोकसंख्या 5443) 197 ब, मेहतर कॉलनी, अंबाबाई पटांगण, अंबाबाई झोपडपट्टी, लघुबाई झोपडपट्टी, राम टेकडी समोरील झोपडपट्टी, लखूबाई झोपडपट्टी, थोरात चौक परिसर, गुर्जर वाडा, कोळ्याचा मारूती परिसर.
  • प्रभाग क्र. 5 (लोकसंख्या 5116) अरुण टॉकीज परिसर, मसादेवी पिछाडी, आपटे शाळा, तांबडा मारूती, हरीदास वेस परिसर, कवठेकर गल्ली, विठ्ठल मंदिर सात मजली पिछाडी, दत्त घाट परिसर, कुंभार घाट.
  • प्रभाग क्र. 6 (लोकसंख्या 5676) चंद्रभागा परिसर, धोंडोपंत दादा मठ, सारडा भवन परिसर, विप्रदत्त घाट परिसर, कालिकादेवी चौक, रोहिदास चौक, विठ्ठल नगर झोपडपट्टी, आंबेडकर नगर झोपडपट्टी, इंदिरा कोष्ठ रोग वसाहत, कर्नाटक मठ.
  • प्रभाग क्र. 7 (लोकसंख्या 5915) इंदिरा गांधी भाजी मार्केट, विठ्ठल मंदिर उत्तर बाजू परिसर, दगडी पाण्याचा हौद, तानाजी चौक परिसर, संभाजी चौक परिसर, उमदे पटांगण, काळा मारूती, शाळा नं. 6 परिसर.
  • प्रभाग क्र. 8 (लोकसंख्या 5019) सोमाणी पेट्रोल पंप, बोहरी पेट्रोल पंप परिसर, शामियाना हॉटेल पिछाडी, शिवाजी चौक परिसर, लोणार गल्ली, सनगर गल्ली, न्यू अकबर टॉकीज परिसर, कबाडे वाडा परिसर, रा. पा. कटेकर डेअरी परिसर.
  • प्रभाग क्र. 9 (लोकसंख्या 5067) सेंट्रल नाना परिसर, नवीपेठ, भाजी मार्केट परिसर, कोंबडे गल्ली परिसर, खवा बाजार परिसर, जुनी पेठ, मटन मार्केट परिसर, कोळे गल्ली, ज्ञानेश्वर मंडप परिसर, महाराष्ट्र निवास परिसर, चिंचबन तालीम परिसर, जय भवानी चौक परिसर, बुरूड गल्ली.
  • प्रभाग क्र. 10 (लोकसंख्या 5987) फत्तेपुरकर नगर परिसर, अकबर गल्ली नगर परिसर, वीरसागर नगर, द. ह. कवठेकर शाळा परिसर, डी. बी. पी. मॉल पिछाडी, सरगम टॉकीज पिछाडी, भोसले ऑईल फॅक्टरी परिसर, ज्ञानेश्वर नगर, महावीर नगर, जैन मंदिर, ऐश्वया हॉटेल.
  • प्रभाग क्र. 11 (लोकसंख्या 5585) साबळे नगर, वाल्मिकी नगर, स्वामी समर्थ, पुनर्वसन गावठाण, इसबावी गावठाण, अक्षद बंगलोज, शिवकीर्ती नगर, विठ्ठल हॉस्पिटल परिसर.
  • प्रभाग क्र. 12 (लोकसंख्या 5844) विठ्ठल मंदिर विसावा परिसर, वैभव ऑईल मिल परिसर, उमा नगर परिसर, वांगीकर नगर परिसर, दूध डेअरी पिछाडी, कंडरेज जीम पिछाडी, समता नगर, देशमुख पंप परिसर, शासकीय वसाहत परिसर, गोकुळ नगर.
  • प्रभाग क्र. 13 (लोकसंख्या 5979) पंतनगर, एकता नगर, हरीहर रेसिडेन्सी, प्रशांत परिचारक नगर, गेंड वस्ती, जिजाऊ नगर, वसंत नगर, नागालँड हॉटेल पिछाडी, कर्मयोगी शाळा, जल शुध्दीकरण केंद्र, विठ्ठल नगर, शहापूरे हॉस्पिटल.
  • प्रभाग क्र. 14 (लोकसंख्या 5357) डॉ. टकले दवाखाना परिसर, लाईफ लाईन परिसर, गाताडे प्लॉट परिसर, तालुका पोलीस स्टेशन परिसर,
  • प्रभाग क्र. 15 (लोकसंख्या 5441) फत्तेपूरकर घर परिसर, माळी वस्ती, ओंकार नगर, वृंदावन नगर, परदेशी नगर, गणेश नगर, रेल्वे स्टेान परिसर, पद्मावती झोपडपट्टी, विस्तापित नगर.
  • प्रभाग क्र. 16 तनपुतरे महाराज मठ परिसर, जनकल्याण हॉस्पिटल परिसर, बडवेचर झोपडपट्टी, घनश्याम सोसायटी, खादीग्राम उद्योग परिसर, गजानन महाराज मठ परिसर, संत पेठ, सावता माळी पिछाडी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी.
  • प्रभाग क्र. 17 (लोकसंख्या 5757) महात्मा फुले पुतळा, गुजराथी कॉलनी, जगदंबा वसाहत, ढोर गल्ली परिसर, ककय्या समाज मठ, शाळा नं. 7 पिछाडी, सुडके गल्ली, सुडगे गल्ली, सातपुते दवाखाना परिसर, ओतारी गल्ली परिसर, महापूर चाळ, बडवेचर झोपडपट्टी काही भाग.
  • प्रभाग क्र. 18 (लोकसंख्या 5554) यमाई तलाव परिसर, उंच विठोबा पिछाडी, भगवान नगर, बागवान मोहल्ला परिसर, रमाई नगर झोपडपट्टी, डोके मळा, सांगोला नाका, गुरूदेव नगर, देवकते मळा, बनसोडे मळा, एम. एस. ई. बी. पिछाडी, आय. टी. आय. कॉलेज.

Back to top button