सोलापूर : दरोडेखोरांचा दोन ठिकाणी दरोडा, एकाचा खून, महिला जखमी

सोलापूर : दरोडेखोरांचा दोन ठिकाणी दरोडा, एकाचा खून, महिला जखमी

Published on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील बोरामणी येथे दर्गनहळ्ळी रस्त्यावर दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडा टाकून एकाचा डोक्यात पाईपने मारून खून केला. तर एक महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

बुधवारची पहाटे एक ते दीडच्या दरम्यान पाच ते सात दरोडेखोरांनी बोरामणी ते दर्गणहळ्ळी रस्त्यावरील शेतातील वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी विरोध झाल्याने दरोडेखोरांनी बाबू हिरजे यांच्या वस्तीवर मोर्चा वळविला. घरात झोपलेल्या बाबू हिरजे यांच्यावर लोखंडी पाईपने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील व कानातील दागिने लुटून नेले.

या घटनेची माहिती मिळताच बुधवारी सकाळी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत बाबू कल्लप्पा हिरजे यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news