कासव संवर्धन : गालजीबाग येथे होणार मरिन इंटरप्रेटेशन्स सेंटर ;कासव संवर्धनासाठी उपयुक्‍त

कासव संवर्धन : गालजीबाग येथे होणार मरिन इंटरप्रेटेशन्स सेंटर ;कासव संवर्धनासाठी उपयुक्‍त

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काणकोण तालुक्यातील गालजीबाग समुद्रकिनार्‍यावर राज्य सरकारच्या वन खात्याने वन्यजीव व इको-टुरिझम उपक्रमाअंतर्गत मरिन इंटरप्रेटेशन्स सेंटर स्थापन करण्याचे निश्‍चित केले आहे. कासवांच्या संवर्धनासाठी उपयुक्‍त ठरणार्‍या या केंद्राला गोवा किनारी व्यवस्थापन विभाग यंत्रणा (जीसीझेडएमए) ने मान्यता दिली आहे. वन संरक्षकांच्या संकल्पनेतून हे केंद्र येथे स्थापन होत आहे.

गालजीबाग व आगोंद या दक्षिण गोव्यातील समुद्र किनार्‍यासोबतच उत्तर गोव्यातील मोरजी व मांद्रे या समुद्र किनार्‍यांची पाहणी केल्यानंतर गालजीबाग येथे हे केंद्र स्थापन करण्याचे ठरले आहे.  200 चौ.मी जागेत हे केंद्र स्थापन होणार असून पर्यटकांसह स्थानिकांना हे केंद्र नो टेक झोन अंतर्गत पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे केंद्र स्थापन केल्यानंतर या केंद्राच्या परिघात पार्ट्याचे आयोजन करणे, तेजस्वी दिवे लावणे, वाहने चालवण़े यावर बंदी असणार आहे. सरकारने यापूर्वी वाळूच्या ढिगार्‍यांचा समावेश करून राज्याच्या चार
स्थानिक समुद्र किनार्‍यावरील वनस्पती ऑलिव्ह रिडले कासव घरटी प्रजातींसाठी एक योजना तयार केली होती.

राज्यातील कासवांच्या घरट्याच्या साहाय्यासाठी जे 'नो-टेक झोन' निश्‍चित करण्यात आले होते, त्यांना मदत करण्यासाठी सरकारची ही योजना आहे.या झोनमध्ये केवळ सागरी संवर्धन सेवा उपक्रम व सागरी जीव उपजीविका यांना परवानगी आहे. राज्याच्या वन व्यवस्थापन विभागाने पर्यावरणाचे रक्षण करताना समुद्रकिनार्‍याची देखभाल आणि समृद्धी करणे सुरूच ठेवले आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news