सातारा : स्वमिळकतीतून तालीम संघ देणार बक्षीस

सातारा : स्वमिळकतीतून तालीम संघ देणार बक्षीस

सातारा : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याने रोख बक्षीस न दिल्याची खंत व्यक्‍त केली होती. त्यानंतर सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने केसरी स्पर्धेतील बक्षीस पात्र 70 पैलवानांना 9 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती तालीम संघाचे प्रमुख साहेबराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साहेबराव पवार म्हणाले, तब्बल 59 वर्षांनंतर जिल्हा तालीम संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे नेटके नियोजन केले. मात्र, अंतिम लढत पार पडल्यानंतर महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याने बक्षिसाविषयी खंत व्यक्‍त केल्याने त्याची सल मनात होती. त्यासाठीच वैयक्‍तिक मिळकतीमधून ही बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला आहे. सुधीर पवार म्हणाले, महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याला एक लाख रुपये, तर उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याला 50 हजार, विविध वजन गटांतून सुवर्ण पदक मिळालेल्या मल्‍लांना 20 हजार, रौप्य विजेत्याला 10 हजार आणि कांस्यपदक विजेत्या मल्‍लाला 5 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

या रकमांचे धनादेश तयार करण्यात आले असून हे धनादेश त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधून हे धनादेश त्यांच्याकडे रवाना करण्यात येणार आहेत. दीपक पवार म्हणले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी एवढ्या मोठ्या रकमांची बक्षीसे देण्यात आली नव्हती. साताराच्या क्रीडा परंपरेला गालबोट लागण्याच्या उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. कष्टाने केलेल्या सर्व कामांना कोणतेही बालंट नको तसेच जे कष्ट प्रामाणिकपणे झाले त्या कष्टांची किंमत झाली पाहिजे. मल्लांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी नोंदवली. त्यामुळेच त्यांचे कौतुक क्रमप्राप्त ठरते म्हणूनच ही बक्षिसाची रक्‍कम देण्यात येणार आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news