Kieron Pollard : कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती | पुढारी

Kieron Pollard : कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने (Kieron Pollard)  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी (दि. २० एप्रिल) त्याने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. काळजीपुर्वक विचार केल्यानंतर मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेत असल्याची पोस्ट त्याने शेअर केली आहे.

पुढे पोलार्ड म्हणाला आहे की, अनेक तरूणांचे वेस्ट इंडिजच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. मी दहा वर्षांचा असल्यापासून हे स्वप्न पाहत होतो. वेस्ट इंडिजच्या संघात मला १५ वर्षे स्थान मिळाले याचा मला अभिमान आहे. मला आजही आठवते की, २००७ साली माझ्या बालपणीचा हिरो ब्रायन लाराच्या नेतृत्वात मला वेस्ट इंडिजकडून पहिल्यांदा संधी मिळाली. (Kieron Pollard)

पोलार्ड आक्रमक फलंदाज आणि उत्कृष्ट फिल्डर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जातो. आयपीएलच्या सध्याच्या १५ व्या हंगामात पोलार्डची कामगिरी खराब राहिली आहे. आज मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी आहे. त्यापुर्वी त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. कायरन पोलार्डच्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिज संघाला एका नव्या कर्णधाराची निवड करावी लागणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button