पुराव्याशिवाय विवाहबाह्य संबंधाचे आरोप करणे ही एक क्रूरताच! हायकोर्टाचा महत्वपूर्ण आदेश

पुराव्याशिवाय विवाहबाह्य संबंधाचे आरोप करणे ही एक क्रूरताच! हायकोर्टाचा महत्वपूर्ण आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : पती किंवा पत्नीने आपल्या जोडीदारावर कोणत्याही पुराव्याशिवाय विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला असेल, तर ती एक प्रकारची क्रूरताच आहे, असे मत छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकतेच मांडले आहे. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, जर एखादी पत्नी पतीला न सांगता आपल्या मुलीच्या लग्नासाठी दागिने गहाण ठेवून कर्ज घेत असेल, तर तीसुद्धा मानसिक क्रूरता आहे.

बिलासपुरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत पतीने न्यायाधीश गौतम भादुडी आणि एन. के. चंद्रवंशी यांच्या खंडपीठात याचिका दाखल केलेली होती. त्यावर छत्तीसगड न्यायालयात सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये क्रूरता आणि परित्याग याच्या आधारावर घटस्फोट देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, "एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही पुराव्याशिवाय विवाहबाह्य संबंधाचे आरोप करणे, संबंधित व्यक्तीसाठी त्रासदायक असते. खासकरून पत्नीकडून पतीवर असे आरोप केले जात असतील, तो केवळ पत्नीचा निष्काळजीपणा आहे. विवाहबाह्य संबंधाचे आरोप हे व्यक्तीच्या समाजातील प्रतिमेवर परिणाम करणारे असते. त्यातून त्याचे मानसिक खच्चीकरण होते. ते एक प्रकारचे कौर्यच आहे", असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

पतीने दाखल केलेल्या याचिकेनुसार ३१ जानेवारी १९८६ रोजी त्यांचा विवाह झाला होता आणि १५ सप्टेंबर २०११ मध्ये पत्नी वेगळी राहू लागली. त्यामुळे पतीने आरोप केला की, पत्नीने वेगवेगळ्या लोकांकडून १०-१२ लाखांचे कर्ज घेतलेले होते. तसेच मुलीच्या लग्नासाठी पत्नीने कर्ज घेण्यासाठी सोन्याचे दागिनेदेखील गहाण ठेवलेले होते.

आरोपांची पुष्टी करण्यासाठी पतीने आपल्या मुलगा आणि मुलीकडे चौकशी केली. त्यावेळी सांगितले की, आई अनेकदा वेगवेगळ्या व्यक्तींकडून कर्ज घेत असते. मुलांनी सांगितले की, आजी नेहमी आईकडे आर्थिक मदत मागते. पतीने पुढे जाऊन एका व्यक्तीची चौकशी केली तेव्हा त्या व्यक्तीकडूनही पत्नीने २५ हजारांचे कर्ज घेतले होते.

पतीने केलेल्या आरोपानंतर पत्नीने पतीवर आरोप केले की, तिच्या पतीचे घराशेजारी राहणाऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे पतीने मला सासरी पाठवून दिले. शेवटी न्यायालयाने मुलांना विचारले असता मुलांनी वडिलांनी केलेल्या आरोपांचे समर्थन केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे की, जर पत्नीने पतीला न सांगता दागिने गहाण ठेवून कर्ज काढले असेल तर हा प्रकार मानसिक क्रूरता आहे. मुलीच्या भविष्याचा विचार न करता लग्नासाठी दिलेले दागिने पतीला न सांगता गहाण ठेवून कर्ज घेतले तर तीदेखील मानसिक क्रूरता असेल."

पहा व्हिडिओ : महागाईचा कळस I पुढारी | अग्रलेख

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news