उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी काही टीप्स | पुढारी

उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी काही टीप्स

उन्हाळ्यामध्ये तीव्र सूर्यप्रकाश, सतत घाम येणे यामुळे त्वचेवर पुरळ येणे, सनबर्न होणे, त्वचा निस्तेज होणे व काळवंडणे यासारख्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे त्वचेची काळजी घेणे. याकरिता खालीलप्रमाणे काही टीप्स आहेत.

– फेशियल क्लिन्झर बदला. उन्हाळ्यात खूप घाम येतो. उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करण्यासाठी त्वचेद्वारे अधिक तेलग्रंथी जमा होतात. म्हणून, तुम्हाला दिवसातून दोनदा तुमचा चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे आणि योग्य जेल किंवा पाण्यावर आधारित फोमिंग (तुमची तेलकट त्वचा असल्यास) किंवा नॉन-फोमिंग (कोरड्या आणि मिश्र त्वचेसाठी) वापरणे आवश्यक आहे. तुमचे क्लिन्झर अल्कोहोल मुक्त आणि पीएच पातळी संतुलित राखणारे असल्याची खात्री करावी. फेशियल क्लिन्झर वापरण्याचा योग्य मार्ग म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुण्यापूर्वी पूर्ण एक मिनीट चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करणे होय.

टीप : चेहर्‍याला सतत साबण लावणे टाळा. त्याऐवजी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून घ्या.
सीरम आणि मॉइश्चरायझरच्या आधी फेस मिस्ट वापरा. हे त्वचेला ताजेतवाने करेल. फक्त चेहर्‍यापासून 8 इंच अंतरावर ठेवून ते संपूर्ण चेहर्‍यावर फवारा करा.

– टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा. या उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला तेलकट होऊ न देता सौम्य सीरम आणि मॉइश्चरायझरचा वापर करा. त्वचेला पोषण देण्यासाठी मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरते.

अँटिऑक्सिडंट्सचा वापर करा. अँटिऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट करतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानाशी लढायला मदत करतात. व्हिटॅमिन सी सीरम किंवा क्रीम हे सूर्यापासून लढण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. अँटिऑक्सिडंट्स देखील कोलेजन वाढवतात आणि अकाली वृद्धत्व टाळतात.

तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे आणि काजू यांचा समावेश करा. हे अँटिऑक्सिडंट्सयुक्त स्रोत आहेत. त्वचेला आतून हायड्रेट करणे ही निरोगी दिसण्याची, तरुण त्वचेची गुरुकिल्ली आहे. त्वचेवर आर्द्रता टिकवण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील पहिले म्हणजे ठराविक अंतराने पाणी पिणे. इतर मार्ग म्हणजे दिवसा हायड्रेटिंग हायलुरॉनिक सीरम, त्वचेला रीहायड्रेट आणि शांत करण्यासाठी रात्री मॉइश्चरायझिंग किंवा जेल आधारित शीट मास्क वापरावा.

नियमितपणे एक्सफोलिएट करायला विसरू नका. आठवड्यातून दोनदा हलका स्क्रब वापरा. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी, छिद्रे स्वच्छ करण्यासाठी, त्वचेवरील घाण निघून जाण्यासाठी आणि रक्त प्रवाह सुधारण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. एक्सफोलिएट करताना ओठ, मान आणि छातीचा वरचा भाग चुकवू नका. त्वचा जोरात घासू नका.

सनस्क्रीन वगळू नका. अतिनील किरणे विशेषतः उन्हाळ्यात तीव्र असतात. त्यांच्यापासून रंगद्रव्य, असमान पोत, सुरकुत्या, डाग, निस्तेज त्वचा होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून, 40 एसपीएफ ब्रॉड स्पेक्ट्रमच्या सनस्क्रीनचा वापर करावा. दर काही तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणे विसरू नका.

मेकअपचा दाट थर लावल्याने त्वचेला श्वासास अडथळा येतो. कारण आर्द्रता आणि उष्णतेचा त्वचेवर खूप परिणाम होतो. त्यामुळे, चेहर्‍यासाठी लाइट पॉवर आधारित उत्पादने किंवा टिंटेड बाम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करावा.

रात्रीच्यावेळी झोपण्यापूर्वी इसेन्शियल ऑईल किंवा नाईट क्रीम वापरा. रात्रीच्यावेळी त्वचेच्या पेशींचे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही रात्रभर चांगला मास्क देखील निवडू शकता.

डोळे, पाय आणि ओठांकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशा संरक्षणासाठी चांगले आय जेल आणि सन प्रोटेक्शन लिप बामचा वापर करा.
उन्हाळ्यात त्वचेची चांगली काळजी घ्या, जास्त एक्सपोजर टाळा आणि शरीर थंड राहण्याचा प्रयत्न करा, आर्द्रता टाळा. आपल्या त्वचेचे नैसर्गिक संतुलन आणि चांगले आरोग्य राखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्वचेची चांगली काळजी घेण होय.

डॉ. रिंकी कपूर

Back to top button