सातारा क्राईम : पैशासाठी वृद्धेला जाळून मारले; झोपडीसह दिले पेटवून
दहिवडी : पुढारी वृत्तसेवा
जाशी (ता. माण) येथे झोपडीसह पेटवून देत एका वृद्धेला जाळून मारल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. त्याने पैशासाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. दरम्यान, या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
श्रीमती सीताबाई जयसिंग गलांडे (वय 72) असे त्या वृद्धेचे नाव आहे. तर नाना दिगंबर गलांडे (वय 20, रा. जाशी, ता. माण), असे संशयिताचे नाव आहे. जाशी येथील सीताबाई गलांडे ही वृध्दा पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या घरी कोणीच नसायचे. त्यांच्या शेजारी राहणारा नाना गलांडे हा त्यांना पैशासाठी वारंवार त्रास देत होता.
दि. 5 जानेवारी रोजी रात्री नाना गलांडेने वृध्देची झोपडी पेटवून दिली आहे. जवळपास कोणीच नसल्याने या घटनेची कोणालाच चाहूल लागली नाही. दोन दिवसानंतर वृद्धेचा भाचा तेथे आला असता त्यांना सीताबाई राहत असलेली झोपडी जळाल्याचे दिसले. त्यामध्ये सीताबाई याही जळून मृत झाल्याचे दिसले. त्यानंतर नातेवाईक उत्तम हरिबा चोरमले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीमध्ये पैशासाठी नाना गलांडे त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त केला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर दहिवडी पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी न्यायालयाने दि. 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सपोनि संतोष तासगावकर करीत आहेत.
हेही वाचलंत का?
- पुणे : लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा ट्रक हडपसर पोलिसांकडून जप्त
- मुंबई : रूग्णालयातील रूग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत निर्बंध वाढवण्याची गरज नाही : राजेश टोपे
- पुणे जिल्हा बॅंक निवडणूक : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच केला हवेलीतील नेत्यांचा गेम
- भारतात मोबाईल नंबरची सुरुवात ६, ७, ८, ९ क्रमांकानेच का हाेते?… जाणून घ्या
- तेरी खूबसूरती की तारीफ़ में क्या लिखूं, कुछ खूबसूरत शब्दों की अभी तलाश है मुझे…
- साताऱ्यात बंद फ्लॅटमध्ये आगडोंब ; आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला

