साताऱ्यात बंद फ्लॅटमध्ये आगडोंब
Latest
साताऱ्यात बंद फ्लॅटमध्ये आगडोंब ; आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील तामजाईनगरमध्ये बंद फ्लॅटला आग लागून आगडोंब निर्माण झाल्याने परिसर हादरला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक पाचारण झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, रविवारी पहाटे तामजाईनगरमध्ये बंद फ्लॅटमधून अचानक धूर येऊ लागला. पाहता पाहता आग वाढत गेली व आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे परिसरातील इतर फ्लॅट धारकांची भंबेरी उडाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
हेही वाचलंत का?

