शिवपुतळ्याच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन; शेकडोंवर गुन्हे | पुढारी

शिवपुतळ्याच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन; शेकडोंवर गुन्हे

नंदुरबार, पुढारी ऑनलाईन : चार दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शहादा शहरांत स्थापन करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे आगमन झाले. या जल्लोषात शहादा वासियांनी काल दिनांक 8 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक काढली. परंतु कोरोना व ओमायक्रॉनच्या प्रसाराचे भान न ठेवता मनाई आदेशाचे व जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून राजकीय पदाधिकारी, संघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अशा शेकडो जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

तथापि शहादा येथील कोविड भरारी पथकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचे साहाय्याक तथा मंडळ अधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 100 ते 125 जणांवर भादवि कलम 188, 268, 269, सह महापोलीस का कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 135, 112, 117 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 बी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

विनापरवागी मिरवणुक काढून सार्वजनिक शांततेचा भंग करीत जिल्हाधिकारी यांच्या कोरोना आणि ऑमिक्रॉन विषयक मनाई आदेशाचे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. सार्वजनिक उपद्रव करतांना आढळले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button