बामणोली (सातारा); पुढारी वृत्तसेवा : कास बामणोली शेंबडीमठ मुनावळेची पर्यटकांना भूरळ पडलीय. कास बामणोली शेंबडीमठ मुनावळे परिसरात पर्यटक वाढले.
अधिक वाचा –
लॉकडाऊनमुळे घरात कोंडून ठेवलेले सातारकर बाहेर पडलेत. शनिवार आणि रविवार असा दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असतो. मात्र, कास बामणोली शेंबडीमठ मुनावळे या परिसरात गर्दी आहे.
अधिक वाचा –
भांबावलीतील वजराई धबधब्याचे आकर्षण
कास परिसरात सातारा, पुणे, मुंबई येथून पर्यटक येताहेत. पर्यटक भांबावली येथील वजराई धबधबा पाहण्यासाठी जातात आहेत.
अधिक वाचा –
मुनावळे येथील केदारेश्वर धबधबा व केदारेश्वर बोट क्लबला पर्यटकांची पसंती आहे. तर कास मुनावळे या ठिकाणाबरोबरच बहुसंख्य पर्यटक हे बामणोली व शेंबडी मठ या ठिकाणी बोटिंगसाठी गेलेले पहावयास मिळाले.
बामणोली, शेंबडी, मुनावळे येथील बोट क्लब शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बंद आहेत.
मात्र, ज्या बोट चालकांचे संपूर्ण कुटुंबच बोटिंगवर चालते असे बोट चालक आपला जीव धोक्यात घालून येणाऱ्या पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देत आहेत.
कोरोना बाबतीत काळजी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन हॉटेल चालक व बोट चालकांनी केले आहे.