सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विजयदुर्ग खाडीला पूर आला आहे. खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
रविवापासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे.
अधिक वाचा
खारेपाटण येथे पूरपरिस्थितीमुळे शुकनदी पात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले आहे. खारेपाटण बाजारपेठमधून बंदरवाडी व सम्यकनगरकडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली आहे.
अधिक वाचा
सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेतात गेल्याने पाण्याखाली गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्ण पाण्याखाली बुडाला आहे.
पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे धारक पुराच्या भीतीने आपल्या वस्तूची आवराआवर करत आहेत.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.
खारेपाटण मधील व्यापारी भीतीच्या छायेखाली आहेत.