सातारा : कोयना परिसरात २.८ रिश्टर स्‍केलचा भूकंपाचा धक्‍का | पुढारी

सातारा : कोयना परिसरात २.८ रिश्टर स्‍केलचा भूकंपाचा धक्‍का

पाटण ; पुढारी वृत्‍तसेवा कोयना धरण परिसरात आज (शुक्रवार) सकाळी ६.३४ वाजता २.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. कोयना परिसरातील हेळवाक गावच्या नैऋत्येस पाच किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती भूकंप मापन केंद्राकडून देण्यात आली आहे.

कोयना, पाटण, पोफळी ,चिपळूणसह चांदोली धरण परिसर तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हा भूकंप जाणवला. या भूकंपात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून, कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button