सातारा जिल्हा परिषदेसमोरील खोदकामात आढळली पुरातन काडतुसे | पुढारी

सातारा जिल्हा परिषदेसमोरील खोदकामात आढळली पुरातन काडतुसे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषदेसमोर सातारा नगरपालिकेची नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. या रिकाम्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना पुरातन काळातील बंदुकीची काडतुसे आढळून आली आहेत.

खोदकाम सुरू असताना सापडलेली काडतुसे  ब्रिटिश काळातील असल्याचा अंदाज  व्यक्त केला जात आहे. सर्व  काडतुसे  गंजलेल्या अवस्थेत असून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

Back to top button