आघाडी सरकारकडून अन्यायाची वागणूक : महेश शिंदे | पुढारी

आघाडी सरकारकडून अन्यायाची वागणूक : महेश शिंदे

कोरेगाव ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात नवे सत्तेचे धुव्रीकरण झाल्यानंतर अडीच वर्षे आमच्यावर महाविकास आघाडी सरकारने अन्याय करण्याचीच भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच उठाव करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्याला निश्चितपणाने न्याय देईल, असा विश्वास आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

नव्या सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावलेले आ. महेश शिंदे हे मंगळवारी कोरेगावात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा बँक संचालक सुनील खत्री, नगराध्यक्ष सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष जाधव, मुख्याधिकारी विजया घाडगे, राजेंद्र इंगळे, बबनराव कांबळे, रामकाका बर्गे, प्राचार्य अनिल बोधे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शहाजी भोईटे, दत्तुभाऊ धुमाळ, पोपटराव जगदाळे, विजय जगदाळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

आ. महेश शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे नावालाच तीन पक्षांचे सरकार होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच ते चालवत होते. त्यांनी शिवसेनेचे पध्दतशीरपणे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. आता राज्यात सुशासन आले आहे.

वाढे ग्रामपंचायत ही शिवसेनेचीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक सदस्य निवडून आला आहे. या ग्रामपंचायतीला निधी दिला नाही तर त्यांच्या एका सदस्यालाच निधी देत कार्यक्रम दिला. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्याला कार्यक्रम दिला म्हणून आम्ही तुमचा कार्यक्रम केला. आमच्या मतदारसंघात तुम्ही परस्पर कार्यक्रम करता, मग आमदार म्हणून आम्ही तुमचा परस्पर कार्यक्रम केला, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी पोपट करपे, विजयराव घोरपडे, हणमंतराव जगदाळे, रत्नदीप फाळके, अजित खताळ, पोपट भोज, भरत साळुंखे, रमेश माने, आप्पा माने, शरद भोसले, बबनराव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक ऍड. शशिकांत क्षीरसागर, राहूल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, स्नेहल आवटे, वनमाला बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, अनिकेत सुर्यवंशी, बाबा दुबळे, संतोष बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, डॉ. विघ्नेश बर्गे, अर्जुन आवटे, विजय घोरपडे, दीपक फाळके, श्रीकांत बर्गे, सचिन फणसे, सुनील निदान, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामतीला किती निधी दिला ते सांगा?

आमच्या निधीत अजितदादांचे योगदान काय? आम्ही निधी आणला तो आमचे नेते ना. एकनाथ शिंदे यांच्याकडूनच. गत 15 ते 20 वर्षात बारामतीला किती निधी दिला याची यादी अजितदादांनी वाचावी. मग त्यांना जनता महाराष्ट्रात फिरू देणार नाही. बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही. बारामतीला पाणी म्हणजे संपूर्ण राज्याला पाणी दिले असे होत नाही, अशी टीकाही आ. शिंदे यांनी केली.

Back to top button