सातारा अपघात : ओढ्यात कार कोसळून कोल्हापूरचे दोघे ठार | पुढारी

सातारा अपघात : ओढ्यात कार कोसळून कोल्हापूरचे दोघे ठार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा अपघात : येथे कार चालकाचा ताबा सुटून गाडी ३० फूट खोल ओढ्यात गेली. यामध्ये कोल्हापूरचे दोघे ठार झाले. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयानजीक असलेल्या ओढ्यात ही गाडी गेली.

अधिक वाचा 

भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला. गाडी साधारणपणे ३० फूट खोल पडली. या घटनेत दोघे जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

अधिक वाचा- 

सातारा अपघात : मृत झालेले दोघे कोल्हापूरचे 

अपघातात मृत झालेले दोघे कोल्हापूरचे असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी पोलिसांनी आणि रिक्षा चालकांनी धाव घेतली. आणि ओढ्यात जाऊन शोध घेत त्यांना बाहेर काढले.

जखमींना साताऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

अधिक वाचा- 

पोवई नाक्याहून कोरेगावच्या दिशेने ही भरधाव कार जात होती. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचलंत का- 

Back to top button