कराडमध्ये घरफोडी; साडेबारा लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

कराडमध्ये घरफोडी; साडेबारा लाखांचा ऐवज लंपास

कराड; पुढारी वृत्तसेवा: कराडमध्ये सुट्टी निमित्त कुटुंबीय फिरण्यास गेले असता शहरातील बनपुरीकर कॉलनी येथील बंद असलेला बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे साडेबारा लाखांचा ऐवज लंपास केला. शनिवार (दि.१४) रोजी घडलेल्या या चोरीमध्ये बंगल्यातील कपाट उघडून त्यातील हिरे, सोन्या चांदीचे दागिने व अंदाजे पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून रविवारी रात्री उशिरापर्यंत या घरफोडीचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती.

देवदर्शनाला जाताना नगर-मनमाड मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू

याबाबत अधिक माहिती अशी की, बनपुरीकर कॉलनी येथे वृषाली पाटील यांचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये त्या पती व मुलीसमवेत राहतात. दरम्यान मुलीला सुट्टी असल्यामुळे ते फिरण्यासाठी बाहेर गावी गेल्या होत्या. तर सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने व नातेवाईकांची लग्न असल्याने त्यांनी डायमंड व सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घरी कपाटात ठेवले होते.

औरंगाबाद : आठेगाव – खेडा शेती वस्तीवर तीन लाखाची चोरी

रविवारी (दि.१५) सकाळी कामगार मावशी बंगल्यावर आल्यानंतर मुख्य गेटचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्वरित वृषाली पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. वृषाली पाटील यांनी त्वरित कराडकडे धाव घेऊन चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

नाशिक : सराफाचे दुकान फोडून चोरी ; 7 तोळे सोने, 2 किलो चांदीवर डल्ला

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी पोलिसांना घरातील कपाट व लॉकर उघडे असल्याचे दिसले. तसेच बेडवर कपडे विस्कटल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घरफोडीची माहिती वरिष्ठांना दिल्यानंर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली केली व तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या. सायंकाळच्या सुमारास ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घरफोडीच्या घटनेतचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती.

हे वाचलंत का?

Back to top button