बारामती : जेसीबी चोरीचा छडा ; दोघांना अटक | पुढारी

बारामती : जेसीबी चोरीचा छडा ; दोघांना अटक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शिर्सूफळ (ता. बारामती) येथून जेसीबी चोरून नेल्याच्या प्रकरणाचा बारामती तालुका पोलिसांनी अखेर छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी सौरभ धनाजी चव्हाण (वय २२, रा. कुरवली, ता. इंदापूर) व संतोष नामदेव घाडगे (वय ३३, रा. धांगवडी, ता. भोर) या दोघांना अटक केली. बारामती न्यायालयाने या दोघांना १ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनीही माहिती दिली.

२१ डिसेंबर २०२१ रोजी शिर्सूफळ येथून जेसीबी चोरीला गेल्याची फिर्याद गणेश कल्याण जाधव (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांनी दिली होती. पोलीस निरीक्षक ढवाण यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक सुधीर काळे, प्रशांत राऊत, अमोल नरुटे, रणजित मुळीक गावडे यांच्या पथकाने चोरट्यांचा माग काढला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चव्हाण व घाडगे यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

चोरीला गेलेला जेसीबी ताब्यात घेण्यात आला. दरम्यान या दोघांनाही बारामती न्यायालयाने रविवार (दि. १ मे) पर्यंत पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश दिले आहेत. तालुका पोलिसांनी यापूर्वी घरफोड्यांचा यशस्वी तपास करत चोरट्यांनी गजाआड केले. त्यानंतर दुचाकी चोरांचा माग काढत त्यांनाही मुद्देमालासह अटक केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button