नाशिक : महिलेला गच्चीवर एकटेच गाठत जबरी चोरी ; दोघांना अटक, तिसरा फरार | पुढारी

नाशिक : महिलेला गच्चीवर एकटेच गाठत जबरी चोरी ; दोघांना अटक, तिसरा फरार

मालेगाव (जि. नाशिक) : अपार्टमेंटच्या गच्चीवर महिलेला गाठून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आदी दागिने हिसकावून तीन चोरट्यांनी पळ काढला. ही घटना प्रयास हॉस्पिटलजवळील सत्यम कॉम्प्लेक्समध्ये रविवारी (दि.8) घडली.

या जबरी चोरी प्रकरणी प्रशांत कापडणीस यांनी कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या मातोश्री इंदूबाई या अंघोळीनंतर गच्चीवर गेल्या होत्या. त्या ठिकाणी तीन तरुण आले. त्यांनी मंगळसूत्र, सोन्याची पाटली, बांगडी असे एक लाख 53 हजार रुपयांचे दागिने काढून घेत पोबारा केला. पोलिसांनी वेगाने तपास यंत्रणा सक्रिय करीत चोरट्यांचा माग काढला. विजय रंजित भालेराव (22, रा. नागझरी) व भटू बापू अमृतसागर (33, रा. बुरुड गल्ली, आदेश चौक, कॅम्प) या दोघांना अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.

हेही वाचा :

Back to top button