

औरंगाबाद (प्रतिनिधी) : कन्नड तालुक्यातील आठेगाव-खेडा रोड परिसरातील एका घरी चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. ९) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
संदीप वाळुंजे (रा.आठेगाव, ता. औरंगाबाद ) हे शेतवस्तीवर आपल्या आई बिजलाबाई वाळुंजे, वडील जयंतराव वाळुंजे, पत्नी सह राहतात. यांनी दिलेल्या फिर्याद नुसार सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर आई-वडील व त्यांचा लहान मुलगा उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरा बाहेर अंगणात झोपायला गेले होते. सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संदीप यांना घराचे कडी उघडी दिसली, तसेच घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला. यामुळे शंका आल्याने घराची पाहणी करत असताना आईच्या खोलीतील लोखंडी पेटी अस्ताव्यस्त दिसून आली. त्याचबरोबर पैसे ठेवलेले ठिकणाहुन पैसे चोरी झाल्याचे दिसून आले.
यावेळी आई-वडील यांच्या जवळ जाऊन बघितले असता आई उठली नाही, तर आईच्या पायातील जोडावे गाबय असल्याचे आढळले. यावेळी आई बेशुद्ध अवस्थेत होती. यामुळे त्यांनी आईस तात्काळ हतनूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
यावेळी, रोख रक्कमेसह एकूण २ लाख ९१ हजार ६०० रुपयांची अज्ञात चोरांनी चोरी केल्याची फिर्याद संदीप वाळुंजे यांनी दिल्याची माहिती ग्रामीण पोलीस बीट जमादार यांनी दिली.
दरम्यान, चोरट्यांनी बिजलाबाई यांच्या पायातील जोडावे काढून नेतेवेळी त्यांच्या तोंडावर बोळा ठेवून तोंड दाबून धरले असावे म्हणून त्या बेशुद्ध झाल्या असाव्यात, असा अंदाज असुन त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.