पुणे : सोनसाखळी चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक | पुढारी

पुणे : सोनसाखळी चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सुरवातीला रेकी करून नंतर दुचाकीवर येऊन महिलांच्या सोनसाखळीची चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडील चौकशीत सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

न्यायव्यवस्थेवरील टीका भोवली : संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल

संजय रामब्रिज सहाणी (21, रा. गोहारपुर, ठाणा पुरंदरपुर, ता. नौतनवा, उत्तरप्रदेश सध्या रा. होळकरवाडी) आणि दिपककुमार अभय सिंग (21, मुळ रा. बिहार सध्या रा. होळकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत २,०६७ नवे रुग्ण, ४० मृत्यू

प्रत्येक वर्षी नव्या राज्यात जाऊन तेथे मिळेत ते काम करून पहिल्यांदा सर्व भागाची ते पाहणी करत होते. त्यानंतर सोनसाखळी चोरीचे प्रकार करत होते. शहरातील सोनसाखळी चोरी आणि चोरीच्या अनुषंगाने युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक प्रल्हाद लोणारे, अमंलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

वाढत्या कोरोना केसेसमुळे दिल्लीत आता मास्क अनिवार्य होणार, न लावल्यास ५०० रुपये दंड

INS विक्रांत घोटाळा प्रकरणात आता नील सोमय्यांना सुद्धा अटकपूर्व जामीन मंजूर

Russia Ukraine War : आता रशियाचे लक्ष्य पूर्व युक्रेन

Back to top button