नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, पाच वाहने लंपास | पुढारी

नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, पाच वाहने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वेगवेगळ्या परिसरांतून चोरट्यांनी पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

राजेश नामदेव सोलाट (रा. देवळाली गाव) यांच्याकडील 60 हजार रुपयांची दुचाकी (एमएच 15 एफई 5617) चोरट्याने नाशिकरोड येथील देवीचौक परिसरातून चोरून नेली. मंगळवारी (दि. 3) ही घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.

लव श्यामराव सदावर्ते (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्याकडील 25 हजार रुपयांची दुचाकी महिंद्रा कंपनीजवळून 27 एप्रिलला चोरीस गेली. या प्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत. कमलेश गुलाबचंद कांकरिया (रा. गुलमोहर कॉलनी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने 6 ते 7 एप्रिलदरम्यान घराजवळून 10 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस तपास करीत आहेत.

संदीप सरबजित थापा (रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने माणिकनगर परिसरातून 3 मे रोजी 20 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
राजाराम सदाशिव अरिंगळे (रा. सामनगाव रोड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडील 30 हजार रुपयांची दुचाकी 19 एप्रिलला औरंगाबाद रोडवरून लंपास झाली. या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button