सातारा : शर्यतीची बैलगाडी प्रेक्षकांत घुसली | पुढारी

सातारा : शर्यतीची बैलगाडी प्रेक्षकांत घुसली

कोरेगाव (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
कोरेगाव येथे रविवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती दरम्यान एक बैलगाडी अचानक बिथरली आणि बाजूला उभ्या असलेल्या प्रेक्षकांमध्ये घुसली. या घटनेत चार ते सहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर आहेत. निगडी येथील उत्तम जगताप गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.

कोरेगाव ते रहिमतपूर मार्गावर एमआयडीसीच्या समोरील जागेत ‘महाराष्ट्र केसरी 2022’ किताब भव्य बैल गाड्यांच्या शर्यती भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांच्या विजेत्यास 5 तोळे वजनाचे सोने व फायनलच्या सर्व गाडी चालकांचा सन्मान करण्यात येणार होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दुपारपर्यंत बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी परिसरातील गावांमधील शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शर्यतीला यात्रेचे स्वरूप आले होते.

शर्यती दरम्यान अचानक एक बैल गाडी प्रेक्षकांमध्ये

शिरल्याने एकच हलकल्‍लोळ माजला. बैलगाडीच प्रेक्षा गॅलरीत आल्याने अनेकांची धावपळ उडाली. अनेकांनी दुसरीकडे पळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ कोरेगाव सातार्‍यात उपचारासाठी दाखल करण्यात आला. या घटनेत निगडी, ता. कोरेगाव येथील उत्तम बाबुराव जगताप हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचलत का ?

Back to top button