सातारा हद्दवाढ भागात नवे 8 प्रभाग : प्रारुप रचना जाहीर | पुढारी

सातारा हद्दवाढ भागात नवे 8 प्रभाग : प्रारुप रचना जाहीर

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा पार्श्वभूमीवर प्रारुप प्रभाग रचना न. पा. कार्यालयात गुरुवारी जाहीर करण्यात आली. सातार्‍यातील 25 प्रभागांचे नकाशे व समाविष्ट परिसराची माहिती घेण्यासाठी न. पा. कार्यालयात नगरसेवकांसह इच्छुक व नागरिकांनी गर्दी केली होती. प्रारुप प्रभाग रचनेबाबत दि. 17 रोजीपर्यंत सुचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहर हद्दवाढ भागात सुमारे 8 नवे प्रभाग (16 वॉर्ड) निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभाग क्र. 1 मध्ये टीसीपीसी, करंजे नाका, दौलतनगर, वाढे फाटा, वेण्णा नदी ते पुन्हा कातकरी वस्ती या दरम्यानचा भाग समाविष्ट आहे. या प्रभागात 7 हजार 378 लोकसंख्या आहे.प्रभाग क्र. 2 मध्ये कातकरी वस्ती, जय मल्हार सोसायटी, जवान हौसिंग सोसायटी, लॅण्ड रेकॉर्ड सोसायटी, जरंडेश्वर नाका, करिआप्पा चौक, लक्ष्मी टेकडी परिसर, कोयना सोसायटी या परिसराचा समावेश आहे. या प्रभाग 7 हजार 559 इतकी लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 3 मध्ये गोरखपूर, पिरवाडी गावठाण, सैनिक स्कूल, म्हाडा कॉलनी, 442 नगरपालिका वसाहत, हिरवाई ते शिंपी गल्ली या भागाचा समावेश असून या प्रभागात 7 हजार 4 इतकी लोकसंख्या आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये कांगा कॉलनी, जेसीओ हौसिंग सोसायटी, शिंदे कॉलनी, राजमाता सुमित्राराजे उद्यान, अमेरिकन चर्च, उत्तेकर नगर, तक्षशिला विद्यामंदिर या परिसराचा समावेश असून या प्रभागात 7 हजार 544 इतक्या लोकसंख्येचा समावेश आहे.

प्रभाग क्र. 5 मध्ये पोवईनाका ते पंताचा गोट, नगरपालिका शॉपिंग सेंटर ते शिवाजी संग्रहालय,एसटी स्टँड, शाहू स्टेडियम, गणेश कॉलनी, सुरुबन, कुबेर विनायक मंदिर, पोलिस परेड ग्राऊंड ते प्रांताधिकारी कार्यालय परिसराचा समावेश असून या प्रभागात 6 हजार 756 इतकी लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 6 मध्ये भोसले मळा, आयोध्या नगर, विमल पार्क, पंचवटी, चिरायू हॉस्पिटल ते सिध्दीविनायक हॉस्टिल, यादव कॉलनी, किर्दत आळी, भैरवनाथ पटांगण, रघुनाथपुरा मस्जिद, होळीचा टेक, इंदलकर पार, बनसोडे वस्ती या परिसराचा समावेश असून या प्रभागात 7 हजार 186 इतकी लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 7 मध्ये प्रेस कॉर्नर ते बुधवार नाका, मेहेर देशमुख कॉलनी, बसाप्पा पेठ, यशवंत हॉस्पिटल, बाबर कॉलनी, एकता कॉलनी या परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्र. 8 मध्ये माजगावकर माळ, महानुभाव मठ ते नाल्याने व नगर परिषद हद्दीने कालव्याने कोहिनूर नालंदा कब्रस्तान ते करंजे तर्फ सातारा पर्यंतच्या परिसराचा समावेश असून या प्रभागात 6 हजार 977 इतक्या लोकसंख्येचा समावेश आहे.

प्रभाग क्र. 9 मध्ये पवार कॉलनी, दत्त मंदिर, शाहूपुरी ग्रामपंचायत कार्यालय, रामध्यान मंदिर, लोकमंगल शाळा, दिवेकर हॉस्पिटल ते समर्थ नगर कॉलनी ते जय- विजय चिंतामणी सोसायटी या परिसराचा समावेश असून या प्रभागात 7 हजार 393 इतक्या लोकसंख्येचा समावेश आहे.

प्रभाग क्र. 10 मध्ये हुतात्मा स्मारक, समता पार्क, शिवाजीनगर कॉलनी, जवाहर कॉलनी, गेंडामाळ मारुती मंदिर ते संकल्प कॉलनी या परिसराचा समावेश असून या प्रभागात 6 हजार 642 इतक्या लोकसंख्येचा समावेश आहे. प्रभाग क्र. 11 मध्ये शाहू बोर्डिंग, कलावती मंदिर, उष:काल मंडळ, मराठा जिमखाना, गडकर आळी, सर्वोदय कॉलनी, समाधीचा माळ, सह्याद्री पार्क, पंचवटी या परिसराचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या 7 हजार 335 इतकी आहे.

प्रभाग क्र. 12 मध्ये जलमंदिर पॅलेस, सुरुची बंगला ते महात्मा फुले मंडई, प्रतापगंज पेठ, महावितरण कार्यालय, प्रतापसिंह हायस्कूल, भोईटे बोळ, म्हसवड बोळ, मच्छी मार्केट, कला व वाणिज्य महाविद्यालय, क्रांती स्मृती अध्यापक विद्यालय, कोटेश्वर मैदान, मोती तळे या परिसराचा समावेश असून या प्रभागात 7 हजार 509 इतकी लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 13 मध्ये 501 पाटी ते तेली खडडा, कैकाड गल्ली, औंधकर मठ, तुळजाभवानी मंदिर, पोलिस मुख्यालय, जगताप कॉलनी व कर्मवीर सोसायईचा काही भाग समाविष्ट असून या प्रभागाची 7 हजार 119 इतकी लोकसंख्या आहे. प्रभाग क्र. 14 मध्ये पोलिस वसाहत, जिल्हा कारागृह ते राजसपूरा पेठ, भवानी विद्यामंदिर, सुशीलादेवी हायस्कूल तालीम संघ मैदान, राजलक्ष्मी टॉकीज ते दंग्या मारुती मंदिर, सम्राट चौक ते गुरुवार परज आणि गोरक्षण बोळ या परिसराचा समावेश असून या प्रभागात 7 हजार 630 इतकी आहे.

प्रभाग क्र. 15 मध्ये कोल्हाटी वस्ती ते घोरपडे टाकी, सुर्या आर्केड, कल्पक अपार्टमेंट, विमल गार्डन, संतोषी माता मंदिर, न. पा. मंगल कार्यालय, सुर्योदय सोसायटी, शिवतीर्थ, विठ्ठललीला कॉम्प्लेक्स, गीतांजली शाळा, हरिजन-गिरीजन सोसायटी वसाहत या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात 6 हजार 673 इतक्या लोकांचा समावेश आहे.

प्रभाग क्र. 16 मध्ये पोस्ट ऑफिस ते जिल्हा न्यायालय ते आरटीओ ऑफिस ते सर्किट हाऊस, जिल्हा परिषद, कर्मचारी वसाहत, शिवाजी कॉलेज, आझाद कॉलेज, कामाठीपुरा या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात 7 हजार 231 इतकी लोकसंख्या आहे. प्रभाग क्र. 17 मध्ये विलासपूर न. पा. कार्यालय, तलाठी कॉलनी, इंदिरानगर, विश्वकर्मा सोसायटी, जिल्हा निबंधक कार्यालय, पारशी विहिर, जगदाळे बाग, पोलिस वसाहत, अजंठा हॉटेल, नंदादीप सोसायटी या भागाचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या 7 हजार 358 इतकी आहे. प्रभाग क्र. 18 मध्ये गोडोली गावठाण, त्रिमूर्ती कॉलनी, जिजाऊ विद्यामंदिर, जुने गोळीबार मैदान, कामाठीपुरा मशीद, अमेय पार्क, वैदू वस्ती, माळीनगर व एसटी कॉलनीचा समावेश असून या प्रभागाची 7 हजार 575 इतकी लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 19 मध्ये श्री मंगळाई देवी, अजिंक्यतारा किल्ला, श्री मंगळवाई कॉलनी, गुरुकूल शाळा, आमराई, विशाल सह्याद्री शाळा, दत्त कॉलनी परिसराचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या 7 हजार 753 इतकी आहे.प्रभाग क्र. 20 मध्ये गुरुब्रम्ह आपार्टमेंट, गुरुवार मेट, अदालत वाडा, शाहू मंडळ, काळा दगड, बेगम मस्जिद व माटेराम मंदिर या परिसराचा समावेश असून या प्रभागाची 6 हजार 981 इतकी लोकसंख्या आहे.प्रभाग क्र. 21 मध्ये चिंतामणी व जीवनज्योत हॉस्पिटल, बालविकास मंडळ, गजानन मंगल कार्यालय, कन्याशाळा, कमानी हौद, भोई गल्ली, शिर्के शाळा मैदान, शाहू उद्यान, गोंधळी गल्ली, वाघाची नळी, गोशाळा, शकुनी मंदिर, भोरी मस्जिद या परिसराचा समावेश असून या प्रभागात 6 हजार 963 इतकी लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 22 मध्ये गोलमारुती मंदिर, भगवा चौक, फुटका तलाव, पंचपाळी हौद, नगर वाचनालय, तांदुळ आळी, कोल्हटकर आळी, गवंडी आळी, लंबे बोळ, हत्तीखाना, राजधानी टॉवर व लोकमंगल कार्यालय या परिसराचा समावेश असून प्रभागात लोसंख्या 6 हजार 768 इतकी आहे. प्रभाग क्र. 23 मध्ये गारेचा गणपती, मांढरे आळी, ढोणे कॉलनी, मटंगे पूल, चिमणपुरा पेठ, जानकर वस्ती, केसरकर कॉलनी, मोरे कॉलनी, पोळ वस्ती, महादरे तलाव या परिसराचा समावेश असून या प्रभागात 6 हजार 844 इतकी लोकसंख्या आहे. प्रभाग क्र. 24 मध्ये नंदादीप अपार्टमेंट, धस कॉलनी, बोगदा जकात नाका, वडार समाज सोसायटी, संत कबीर सोसायटी, समाजमंदिर,

भोई गल्ली, नागाचा पार, न. पा. चाळ या परिसराचा समावेश होतो. या प्रभागात 7 हजार 405 इतक्या लोकसंख्येचा समावेश होतो. प्रभाग क्र. 25 मध्ये गांधी क्रीडा मंडळ, गणेश टाकी, स्टेट बँक कॉलनी, होलार समाज मंदिर, खारी विहिर, सूर्यवंशी अपार्टमेंट, ठक्कर कॉलनी, जंगीवाडा, सज्जनगड अपार्टमेंट, समर्थ मंदिर, दस्तगीर कॉलनी, झंवर शाळा ते एसएमएस शाळा या परिसराचा समावेश होतो. या प्रभागात 7 हजार 207 इतकी लोकसंख्या आहे.

17 तारखेपर्यंत हरकती घेता येणार

प्रारुप प्रभाग रचना व नाकाशासंबंधी हरकती व सुचना दि. 17 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नगरपालिकेत मुख्याधिकार्‍यांकडे सादर करता येतील. दरम्यान, शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात शाहुपूरी, दरे खुर्द, तामजाई नगर या भागात सुमारे 4 प्रभाग निर्माण झाले आहेत. करंजे ग्रामीण, पिल्लश्वर नगर, दौलत नगर या परिसरात 1 प्रभाग आणि विलासपूर, गोडोली ग्रामीण शाहूनगर या परिसरात सुमारे 3 प्रभाग निर्माण झाल्याचे प्रारुप प्रभाग रचनेवरुन स्पष्ट झाले.

सातारा पालिकेत 43 जागा खुल्या प्रवर्गासाठी

सातारा पालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्या असून आरक्षणानुसार सदस्य संख्याही स्पष्ट करण्यात आली आहे. सातारा पालिकेची सदस्यसंख्या 50 इतकी आहे. ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे सातारा नगरपालिका निवडणुकीत 43 जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 6 तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. एकूण 50 जागांपैकी निम्म्या 25 जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.

Back to top button